शिवभोजन थाळी भागविणार गरजूंच्या पोटाची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:35 AM2021-04-15T04:35:38+5:302021-04-15T04:35:38+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर लागू केलेल्या अंशत: लॉकडाऊनपासून सर्व शिवभोजन केंद्रांवर पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे. दुपारी १२ ...
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर लागू केलेल्या अंशत: लॉकडाऊनपासून सर्व शिवभोजन केंद्रांवर पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत हे केंद्र सुरू असते. या केंद्रांवरील शिवभोजनाच्या मर्यादित थाळ्यांची संख्या लॉकडाऊनच्या काळात वाढवावी लागणार आहे.
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र १२
दररोज किती जण घेतात लाभ १०००
थाळ्यांचा कोटा वाढविणार का?
- सध्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या केंद्रांवर २०० थाळ्या, तर तालुकास्थळी असलेल्या शिवभोजन केंद्रांवर दररोज केवळ ७५ थाळ्यांची मर्यादा असते. त्यामुळे मर्यादित लोकांना जेवण मिळते.
- गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळ्यांचा मर्यादित कोटा काढून जेवढे लोक येतील त्या सर्वांना थाळ्या देण्याचे निर्देश होते. यावेळीही तसे करणार की, कोटा वाढवून देणार याकडे गरजूंचे लक्ष लागले आहे.
(कोट)
काय म्हणतात भोजन घेणारे
- आम्ही शिवभोजन केंद्रात नेहमीच येत असतो. एवढ्या स्वस्त दरात बाहेर नाष्टाही होत नाही. पण इथे जेवण मिळत असल्यामुळे मोठा आधार होतो. लॉकडाऊनच्या काळात थाळ्यांची संख्या वाढविली तर गोरगरिबांना जास्त लाभ होईल.
- अतुल हुलके
लॉकडाऊनच नाही तर नेहमीसाठी हे शिवभोजन सामान्य लोकांसाठी खूप गरजेचे आहे. कधी कोटा संपला तर जेवण मिळू शकत नाही. आता लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गर्दी अजून वाढेल. त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
- पवन वाढई