भारनियमनाविरोधात शिवसैनिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:43 PM2017-09-25T23:43:52+5:302017-09-25T23:44:08+5:30

महावितरणच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन करण्यात येत आहे.

Shivsainik Aggressive against Bharayamamana | भारनियमनाविरोधात शिवसैनिक आक्रमक

भारनियमनाविरोधात शिवसैनिक आक्रमक

Next
ठळक मुद्देतहसीलवर धडक : मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महावितरणच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन करण्यात येत आहे. शिवाय केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे. भारनियमन व दरवाढीच्या मुद्यावर युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होत सोमवारी थेट स्थानिक तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
याप्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, शिवसेना तालुका प्रमुख माणिक भोयर, शहर प्रमुख भूषण सातव, माजी पं.स. सदस्य तानाजी कुथे, मधुसुदन चौधरी, कुणाल भरणे, उल्हास मने, अक्षय चाचरकर, सौरभ जक्कनवार, शैलेश चिटमलवार, अमित सुरपाम, जयंत दहिकर, निशांत ठवकर, चेतन तिजारे, अनंता मेश्राम, मुकेश ठाकरे तसेच युवा व शिवसैनिक उपस्थित होते.
शासनाने वीज भारनियमन रद्द करावे, तसेच केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेल व गॅस सिलिंडरची केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी निवेदनातून केली आहे. मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी दिला आहे. वीज भारनियमन सुरू असल्याने कृषीपंपामार्फत शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकºयांना अडचणी येत आहेत. धान पीक ऐन उंबरठ्यावर असताना महावितरणने भारनियमाचा शेतकºयांना करंट दिला.

Web Title: Shivsainik Aggressive against Bharayamamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.