महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:40 AM2017-09-23T01:40:30+5:302017-09-23T01:40:44+5:30

निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती.

 Shivsainik Tahsil office was attacked against inflation | महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव : पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करू, असेही सांगितले होते. परंतु दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. परिणामी सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गडचिरोली तहसील कार्यालयावर गुरूवारी धडक देऊन तहसीलदारांना घेराव करण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह स्वस्त धान्य दुकानात आॅनलाईनच्या नावाखाली गरिबांची दिशाभूल केली जात आहे. त्यातच गरिबांना मिळणारी साखरही बंद करण्यात आली. शेतकºयांच्या धानाला हमी भाव नाही. डिझेल, पेट्रोल, गॅस, केरोसीन व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. ग्रामीण भागात भार नियमन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दयाराम भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा प्रमुख (अहेरी विभाग) विजय श्रुंगारपवार, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, वासुदेव शेडमाके, नंदू कुमरे, राजू कावळे, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, तालुका प्रमुख घनश्याम कोलते, प्रसिद्धी प्रमुख संजय आकरे, ज्ञानेश्वर बगमारे, विनोद जांगीळ, त्र्यंबक खरकाटे, आकाश सुमंतवार, धनंजय भैसारे, सोमेश भोयर, पंढरी गेडाम, राजकुमार पदा, मंजूषा पदा, जयश्री कोठारे, ललीता दोडके, भाष्कर मेश्राम, शुद्धत चुधरी, अजय ठाकरे, पंकज तटलावार, अश्रफ पठाण, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधारी भाजप नेत्यांच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली. यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा दिला.

Web Title:  Shivsainik Tahsil office was attacked against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.