शिवसेनेचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:02 AM2017-10-18T00:02:53+5:302017-10-18T00:03:03+5:30
प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले.
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना अजूनही वीज पुरवठा झाला नाही. परिणामी तेथील नागरिकांना अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. अनेक शेतकºयांनी शेतात वीज पुरवठा करून पंप बसविण्यासाठी वीज विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही त्यांना वीज पुरवठा करण्यात आला नाही. अनेकांकडे विहिरी आहेत. मात्र पंप नसल्याने बेकामी ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिकांना १० ते १५ हजार रूपयापर्यंतचे बिल पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. घरात दोन बल्ब, एक पंखा असतानाही १० ते १५ हजार रूपयांचे बिल कसे पाठविले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्यांच्या लक्षात येत नाही. सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
सदर मोर्चा उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुंचावार, कामगार सेना प्रमुख विलास परमेलवार, रेणुका बोरूले, बालू शेंडे, सुशिला रच्चावार, रमेश गंगावणवार, वसंत चापले, श्यामसुंदर कुंभारे, बंडू तलांडे, दलसू तलांडे, महेश बिरमवार, राजू उसेंडी, बंडू पुंगाटी, रितूू कुळेपेटी, श्यामदास पुंगाटी, लालू मडावी, दोहे तलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.