कुरखेडातील दुकान गाळ्यांना भाडेकरू मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:48+5:302021-07-20T04:24:48+5:30
येथील गांधी चौकात जुन्या पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी ७ चौरस मीटर क्षेत्रफळाचे ८ व्यावसायिक गाळ्याचे बांधकाम शासकीय निधीतून नगर पंचायत ...
येथील गांधी चौकात जुन्या पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी ७ चौरस मीटर क्षेत्रफळाचे ८ व्यावसायिक गाळ्याचे बांधकाम शासकीय निधीतून नगर पंचायत यांचा वतीने करण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण हाेऊन जवळपास ३ वर्षाचा कालावधी झालेला आहे. नुकतीच गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मुख्य मार्गापासून आतमध्ये एका बाजूला ही गाळ्याची चाळ असताना व फक्त ७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या गाळ्याचे मासिक भाडे अव्यावहारिकपणे ८ हजार १८ रु. निश्चित करण्यात आल्याने लिलावात कोणत्याच व्यावसायिकाने भाग घेतला नाही व लिलाव प्रक्रिया बारगडली. गाळ्यांचा लिलाव न झाल्यास नगर पंचायतचे उत्पन्न बुडणार आहे. त्यामुळे व्यावहारिक पणे फेरविचार करीत व्यावसायिकाना परवडेल, असे मासिक भाडे निश्चित करीत पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी माेहबंसी यांनी केली आहे.
बाजारवाडीत अनेक वर्षापासून लाकडी ठेल्यावर व्यवसाय करून आपला चरीतार्थ चालविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे ठेले हटवत याठिकाणी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मानवी दृष्टिकोनातून यापूर्वी ज्या व्यावसायिकांचे येथे ठेले होते त्याच व्यावसायिकाना गाळे देताना प्राधान्य द्यावा, अशी मागणी केली आहे.
180721\0648img20210718152910.jpg~180721\0648img20210718152910.jpg~180721\0648img20210718152910.jpg
लीलाव आयोजित करण्यात आला होता ते दूकान गाळे~लीलाव आयोजित करण्यात आला होता ते दूकान गाळे~लीलाव आयोजित करण्यात आला होता ते दूकान गाळे