दुकानदाराला ठोठावला १० हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:37+5:302021-04-25T04:36:37+5:30
सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील. शनिवार आणि रविवारी फक्त वैद्यकीय सेवा वगळून सर्व दुकाने ...
सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील. शनिवार आणि रविवारी फक्त वैद्यकीय सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील, असा आदेश काढला असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सदर दुकानदाराने शनिवारी (दि.२४) मूल रोडवर असलेले बिल्डिंग मटेरिअलचे दुकान सुरू ठेवलेले आढळले. त्यामुळे त्याला १० हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला. ही कारवाई चामोर्शीचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, नगर पंचायत अभियंता निखिल कारेकर, कर्मचारी विजय पेट्टीवार, विष्णू गुडधे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर लाकडे, विजय केंद्रे, प्रितल इप्पर, होमगार्ड मुकेश गुरनुले, सुभाष सुरजागडे, जितेंद्र कातलवार यांनी केली.
नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने २३ एप्रिल रोजी ३ दुकानदारांकडून ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला होता. सलग दुसऱ्या दिवशी एका दुकानदाराकडून १० हजारांचा दंड वसूल केल्याने बेशिस्त व्यावसायिकांना चांगलाच धक्का बसला आहे.