प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; सर्वप्रकारच्या ट्रॅव्हल्स यार्डमध्येच जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:40 AM2021-08-24T04:40:59+5:302021-08-24T04:40:59+5:30
गडचिराेली : गेल्या दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. शासनाने बऱ्याच प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता दिली असली तरी ...
गडचिराेली : गेल्या दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. शासनाने बऱ्याच प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता दिली असली तरी खासगी ट्रॅव्हल्स अद्यापही पूर्णपणे मार्गावर धावल्या नाही. काही ट्रॅव्हल्सवगळता बहुतांश साध्या व वातानुकूलित ट्रॅव्हल्स यार्डमध्येच जमा आहेत. डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ झाली; परंतु रक्षाबंधनालाही ट्रॅव्हल्सची चाके फिरली नाही. काेराेनाकाळात आवागमनाची समस्या निर्माण झाल्याने अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली. त्यामुळे एस.टी.सह खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी वाहतुकीला फटका बसला. कमी प्रवाशात लांबचा प्रवास परवडत नाही.
बाॅक्स ........
ट्रॅव्हल्सची संख्या जुनीच कायम
गडचिराेली जिल्ह्यात विविध टुर्स व ट्रॅव्हल्स कंपनीच्या जवळपास ६० ट्रॅव्हल्स आहेत. लाॅकडाऊनकाळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली तेव्हापासून काही काळ प्रवासी वाहतूक बंद हाेती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने प्रवासी वाहतूक सुरू झाली.
पूर्णत: प्रवासी वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे नवीन ट्रॅव्हल्सची खरेदी काेणत्याही कंपनीने केली नाही. जुन्याच ट्रॅव्हल्स कायम आहेत.
काेट ......
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
ट्रॅव्हल्स संचालकांच्या वतीने दरवर्षी शासनाला लाखाे रुपयांचा कर दिला जाताे; परंतु संकटकाळात सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही. डिझेल दरवाढीने शतक गाठल्याने भाडेवाढ झाली आहे. परंतु आम्ही अद्यापही ट्रॅव्हल्स बंदच ठेवल्या आहेत.
- राजेश बाेमनवार, ट्रॅव्हल्स संचालक
बाॅक्स .....
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ
मार्ग आधीचे भाडे आत्ता
गडचिराेली-नागपूर ३०० ४००
गडचिराेली-चंद्रपूर ९० ९०
गडचिराेली-पुणे १५०० २०००
गडचिराेली-नाग.-हैद्राबाद १५०० १८००