आरमोरी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:56+5:302021-04-11T04:35:56+5:30
जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत साडेतीन हजाराच्या वर तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दीड हजारांच्या वर लसीकरण झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध लसचा साठा शुक्रवारी संपल्यामुळे अनेकांना घरी वापस जावे. लागले. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणाची सोय उपलब्ध झाली असल्याने ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथकामध्ये जात आहेत. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रातही पुरेसा साठा शिलक राहिला नाही. केवळ एक-दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काेट
आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीचा साठा संपला असला तरी सोमवारपर्यंत लस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. जिल्हाधिकारी यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत सदर बाब अवगत करून देण्यात आली आहे. आजपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ३८४० लोकांचे लसीकरण झाले आहे. दररोज २०० च्या वर लसीकरण केले जात होते.
डॉ. छाया उईके,
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय आरमोरी