शॉर्टसर्किटने तणसाचे पाच ढीग जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:11 AM2019-05-09T00:11:52+5:302019-05-09T00:12:11+5:30

येथून जवळच असलेल्या सिमलतला गावालगत ठेवलेल्या तणसाच्या पाच ढिगांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. वादळामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे ठिणगी खाली पडून तणसाच्या ढिगाला आग लागली.

The shortscrew hit five heaps of sesame | शॉर्टसर्किटने तणसाचे पाच ढीग जळून खाक

शॉर्टसर्किटने तणसाचे पाच ढीग जळून खाक

Next
ठळक मुद्देसिमुलतलातील घटना : ३२ हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : येथून जवळच असलेल्या सिमलतला गावालगत ठेवलेल्या तणसाच्या पाच ढिगांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
वादळामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे ठिणगी खाली पडून तणसाच्या ढिगाला आग लागली. यात शेतकरी रतन पाईक व सुजन पाईक यांची प्रत्येकी १० बंड्या तणस जळाली. त्यांचे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. सुनील मसीद यांच्या आठ हजार रुपये किमतीच्या १४ बंड्या तणीस जळाली. संदीप बाढई यांची पाच हजार रुपये किमतीचे तणीस जळाले. आशा सरकार यांचे १२ बंड्या तणीस जळाली. घटनेचा पंचनामा तलाठी व्ही.आर.आलाम यांनी केला. तणसाच्या ढिगाला लागलेली आग विझविण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे तणीस पूर्णत: जळून खाक झाले. सिमलतलाचे सरपंच सजन बिश्वास यांनी अग्निशमन वाहन उपलब्ध करण्यासाठी फोनवरून प्रयत्न केले. मात्र गाडी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The shortscrew hit five heaps of sesame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग