लिंक फेलचा पोस्टाच्या ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:38 AM2018-03-15T00:38:52+5:302018-03-15T00:38:52+5:30

येथील पोस्ट आॅफिसमधील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मागील तीन दिवसांपासून लिंक फेल झाली आहे. त्यामुळे खातेदारांची कामे ठप्प पडली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Shot of Link Fail Post Customers | लिंक फेलचा पोस्टाच्या ग्राहकांना फटका

लिंक फेलचा पोस्टाच्या ग्राहकांना फटका

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची पदे रिक्त : खातेदारांना पैशासाठी माराव्या लागत आहेत वेळोवेळी चकरा

ऑनलाईन लोकमत
आष्टी : येथील पोस्ट आॅफिसमधील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मागील तीन दिवसांपासून लिंक फेल झाली आहे. त्यामुळे खातेदारांची कामे ठप्प पडली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
आष्टी पोस्ट कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे १७ गावे आहेत. पोस्टाच्या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. डाक विभाग केंद्र सरकारच्या मार्फत चालविला जात असल्याने या विभागाच्या योजनांवर नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे शेकडो नागरिक पोस्टामध्ये पैसे भरतात. परिणामी दरदिवशी या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी राहते. पोस्टाचे जवळपास सर्वच कामकाज आॅनलाईन झाले आहे. त्यामुळे कामकाज करण्यासाठी लिंक असणे आवश्यक आहे. पोस्टाच्या माध्यमातून आरडी कलेक्शन, मासिक ठेवी गोळा केल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून पोस्टामध्ये दरदिवशी लाखो रूपयांचे व्यवहार होतो. मात्र ग्राहकांना आरडी भरल्यानंतर पासबुक मिळण्यास विलंब होत आहे. अनेक ग्राहकांना मॅच्युरिटी झाल्यानंतर पैसे मिळण्यास चकरा माराव्या लागत आहेत. यापूर्वी आरडीची मॅच्युरिटी झाल्यानंतर धनादेश उपलब्ध होत होता. आता मात्र पोस्टाचे बचत खाते काढावे लागत आहे. मात्र बऱ्याचवेळा लिंक फेल राहते किंवा तांत्रिक बिघाड राहत असल्याने वेळेवर पैसे मिळत नाही. परिणामी ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. यावर उपाय शोधावा, अशी मागणी होत आहे.
दोन दिवसात समस्या लागणार मार्गी
पोस्टातील लिंक फेलबाबत पोस्ट मास्टर ए.यू. गोखरे यांना विचारले असता, मागील एक महिन्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पोस्टात बसून ग्राहकांचे पासबुक अपडेट करण्याचे काम सुरू आहे. या कार्यालयात कर्मचारी कमी आहेत. आठ दिवसांपूर्वी नवीन लिपीक रूजू झाला आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांचे पासबुक तयार झाले आहेत. एक ते दोन दिवसांमध्ये सॉफ्टवेअरचे काम पूर्ण होऊन ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे मिळतील. आजपर्यंत पोस्टातील लिपीक डेप्युटेशनवर दुसरीकडे राहत होता. त्यामुळे पोस्टाचा कारभार एकट्या पोस्ट मास्टरलाच सांभाळावा लागत होता. आता ही समस्या दूर होणार आहे.

Web Title: Shot of Link Fail Post Customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.