कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने रक्तदान करावे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:07+5:302021-07-04T04:25:07+5:30

गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने २ जुलैपासून सुरू झालेल्या महारक्तदानातील पुढची कडी जोडण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांत रक्तदान शिबिरे ...

Should a person who has recovered from a corona donate blood? | कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने रक्तदान करावे का?

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने रक्तदान करावे का?

Next

गडचिरोली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने २ जुलैपासून सुरू झालेल्या महारक्तदानातील पुढची कडी जोडण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांत रक्तदान शिबिरे होत आहेत. या विक्रमी अभियानात सहभागी होऊन कोणाचा जीव वाचविण्यात आपलेही योगदान असावे म्हणून अनेक जण सरसावत आहेत. पण हे करताना काहींच्या मनात वेगवेगळ्या शंका आहेत. विशेषत: कोरोना होऊन गेलेल्यांना रक्तदान करता येते का, लस घेतल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करता येते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागपुरातील प्रख्यात डॉक्टरांनी दिली आहेत. ती प्रश्नोत्तरे खास लोकमतच्या वाचकांसाठी जशीच्या तशी येथे देत आहोत.

१) कोणत्या वयाच्या लोकांना रक्तदान करता येते?

- १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ६० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना रक्तदान करता येते.

२) कोरोनामधून बरे झाल्यावर रक्तदान करता येते का?

- होय. २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते. रक्तदात्यास त्या २८ दिवसांमध्ये खोकला, सर्दी व ताप यांची लक्षणे नसावीत.

३) लस घेतल्यानंतर रक्तदान करता येते का?

- होय. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतरच्या १४ दिवसांनी रक्तदान करता येते.

४) एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा कधी करता येते?

- ३ महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करता येते. वर्षातून चार वेळा रक्तदान करता येते.

५) महिलांना रक्तदान करता येते का?

- होय. निरोगी आणि सुदृढ व्यक्तीला रक्तदान करता येते. ४५ किलोपेक्षा जास्त वजन असणारे पुरुष आणि ५० किलोपेक्षा जास्त वजन असणाऱ्या महिलांना रक्तदान करता येते. महिलांचे हिमोग्लोबिन १२.५ मिलिग्रॅम असल्यास रक्तदान करता येते. गरोदर असल्यास किंवा मूल अंगावर स्तनपान करत असल्यास, अथवा मासिक पाळी सुरू असल्यास महिलांनी रक्तदान करू नये.

- डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात असणारे सगळे रक्तदान करू शकतात.

- रक्त दिल्यामुळे शरीरात नवीन रक्त तयार होते. बोनमॅरो स्टीम्युलेट होतात. ३६ तासांनी नवीन रक्त तयार होते. परिणामी शरीरात नवचेतना येते.

- रक्तदानामुळे आत्मिक समाधान, सामाजिक ऋण फेडण्याचा आनंद मिळतो. ज्याचे मूल्य करणे अशक्य असते.

- उपाशीपोटी रक्तदान करू नये. रक्तदानाच्या आधी काहीतरी व्यवस्थित खाल्ले पाहिजे.

(बॉक्स)

आरमोरीच्या शिबिरात अनेकांचा सहभाग

लोकमतच्या रक्तदान महायज्ञात दि. ५ जुलै रोजी आरमोरी येथील श्री साई नर्सिंग स्कूल येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या आयोजनात श्री साई नर्सिंग स्कूलसह नवदुर्गा उत्सव मंडळ, लोकमत सखी मंच शाखा आरमोरी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या शिबिराला आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, आरमोरी नगर पालिकेचे गटनेते सुदाम मोटवानी, आरोग्य सभापती भरत बावनथडे, नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष मन्नू मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते चिनी मोटवानी, पं.स.चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार यांची उपस्थिती राहणार आहे. संकलित रक्ताद्वारे कोरोनाच्या संकटकाळात सापडलेल्या जिल्ह्यातील रुग्णांच्या रक्ताची गरज भागवली जाणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष सुधाकर साळवे, जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखी मंच जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, तालुका संयोजिका सुनीता तागवान यांनी केले आहे.

Web Title: Should a person who has recovered from a corona donate blood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.