वैरागडच्या देवळातला श्रीगणेश

By admin | Published: September 19, 2015 01:58 AM2015-09-19T01:58:11+5:302015-09-19T01:58:11+5:30

लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी जनसामान्यात जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली.

Shree Ganesha at Vairagad Temple | वैरागडच्या देवळातला श्रीगणेश

वैरागडच्या देवळातला श्रीगणेश

Next

८६ वर्षांची परंपरा कायम : जिल्ह्यातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचा मान
वैरागड : लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी जनसामान्यात जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. त्याचे लोण देशभर पसरले. त्या कालखंडात दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिवंगत गो. ना. मुनघाटे यांचे वडील नारायणराव मुनघाटे वैरागड येथे तलाठी होते. त्यांनी १९२९ मध्ये वैरागडच्या गाढे मोहल्ल्यातील देवळात गणेशोत्सवाला सुरूवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता, अशी मान्यता आहे.
सरकारी दप्तरी काम करणारे तलाठी नारायण मुनघाटे म्हणजे देशभक्तीने भारावलेले व्यक्तीमत्त्व. त्यांनी त्या काळातील त्यांचे सहकारी दिवंगत मारोतराव बोडणे, केशवराव लांजेवार, गणपती बोडणे, भैय्याजी पोपळी, धर्मा आयटलवार, सखूबाई बोधनकर, कोंडेकार यांच्या सहकार्याने गाढे मोहल्ल्यातील देवळात गणेश चतुर्थीपासून ८६ वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. तेव्हा चंद्रपूर व गडचिरोली हा एकच जिल्हा होता. तेव्हा स्थानिक चंद्रपूर शहरात केवळ दोन सार्वजनिक गणेश मंडळे होती. गडचिरोली येथे सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी खासगी गणपतीची स्थापना होत असे आणि वैरागड येथे देवळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. सन १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याचा विचार केल्यास वैरागडच्या देवळातील सार्वजनिक गणपतीला गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या गणपतीचा मान आहे. आजही या गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे. तलाठी नारायण मुनघाटे यांच्या मृत्यूनंतर दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गो. ना. मुनघाटे हे नित्य नेमाने येथे गणेशाच्या दर्शनाला यायचे. त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे हे गणेशाला वंदन करण्यासाठी दरवर्षी वैरागड येथे येतात. ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आजही कायम राखली आहे. या गणेशोत्सवासाठी रघुनाथ मानकर, राजू बावणे, बालाजी पोपळी, शिवा गरवे, घनशाम लांजेवार, श्रीराम कामतकर, चिंतामन बावणकर, नेताजी नेवारे, दुमाने आदी मंडळी सहकार्य करीत आहेत. वैरागडचा हा ८६ वर्षांचा जूना सार्वजनिक उत्सव अजुनही उत्सवाच्या पठडीतच साजरा केला जातो. धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. (वार्ताहर)

Web Title: Shree Ganesha at Vairagad Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.