श्रीराम कथा जीवन जगण्याचा मंत्र शिकविते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:34 PM2018-01-09T22:34:21+5:302018-01-09T22:35:36+5:30
प्रभू श्रीरामचे चरित्र व उद्धारता दाखविणारे ग्रंथ म्हणजे ‘श्रीराम कथा’ आहे. या श्रीराम कथेतून मनुष्य आपले जीवन सुलभ कसे जगावे, हे शिकवित असते, ...
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : प्रभू श्रीरामचे चरित्र व उद्धारता दाखविणारे ग्रंथ म्हणजे ‘श्रीराम कथा’ आहे. या श्रीराम कथेतून मनुष्य आपले जीवन सुलभ कसे जगावे, हे शिकवित असते, असे प्रवचन परमपुज्य परमानंद महाराजांनी श्रीराम कथेचे दुसरे पुष्प गुफतांना बोलत होते.
गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर ८ जानेवारीपासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसºया दिवशी भक्ती व विश्वास याबाबत ते राम कथेच्या माध्यमातून प्रवचन करीत होते. भगवान शिवशंकराने श्रीरामचंद्राच्या भक्तीत संपूर्णपणे आपले जीवन विश्वासासोबत समर्पित केले. मात्र देवी सतीने श्रीराम चंद्राची भक्ती तर केली पण मनात विश्वास ठेवला नाही. त्यामुळे ती परमेश्वराला ओळखू शकली नाही. भक्तीमध्ये जर विश्वास असेल तर निश्चितच आपण परमेश्वराची अनुभूती करू शकाल, अशी श्रीराम कथा मनुष्यांना संदेश देत असते. कलियुगात जर सुखी-सुमृद्धी जीवन जगायचे असेल तर प्रभू श्रीरामाचे नाव अंत:करणातून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.
गुडमार्निंग व गुडइव्हिनिंग तसेच सकाळी चहाचा कप हातात घेणे यासारख्या पाश्चात्य संस्कृतीला बळ न देता हिंदू सनातन संस्कृतीतून सकाळी व सायंकाळी मनुष्याने मनुष्याला राम-राम असे म्हटले पाहीजे व हातात चहाचा कप न घेता दोन्ही हात जोडून सर्वप्रथम आपल्या गुरूजन, आई-वडील व सूर्यनारायणाला नमस्कार केला पाहिजे. आपल्या सुखी-समृद्ध जीवनाची सुरुवात केली पाहिजे, असे प्रवचन परमानंद महाराज यांनी राम कथेतील भाविक-भक्तांना संबोधित करताना दिले.
श्रीरामचंद्राच्या व शिव विवाहाचे सुंदर तसेच संगीतमय भजांनाचा भाविक भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला. श्रीराम कथा एकण्यासाठी शेकडो महिला व पुरूष भाविक उपस्थित राहत आहेत. श्रीराम कथेबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होण्यास फार मोठी मदत झाली असल्याचे दिसून येत आहे.