प्रवासी निवाऱ्याला झुडुपांचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:37+5:302021-01-08T05:57:37+5:30
मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला ...
मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडूपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्यावतीने प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती केली जात नाही.
रिक्त पदांमुळे होतोय कामांवर परिणाम
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
आठवडी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यासह ग्राहकांना त्रास होत आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाढले अतिक्रमण
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
काेराेेनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात काही दिवसानंतर दुसरी लाट आल्यास पुन्हा व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. आराेग्य विभागामार्फत जागृती केली जात असले तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.