विद्युत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला झाडाझुडपांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:24+5:302021-09-09T04:44:24+5:30

वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून वैरागड, मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, पिसेडवधा, भाकरोंडी, मांगदा, कुलीकुली, वडेगाव, कुरवडी व परिसरातील ...

Shrubs surround the residence of electrical workers | विद्युत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला झाडाझुडपांचा वेढा

विद्युत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला झाडाझुडपांचा वेढा

Next

वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून वैरागड, मोहझरी, सुकाळा, मानापूर, देलनवाडी, पिसेडवधा, भाकरोंडी, मांगदा, कुलीकुली, वडेगाव, कुरवडी व परिसरातील ५० गावांचा वीज नियंत्रणाचा कारभार सुरू आहे पण येथील वीज कार्यालयातील दोन-तीन कर्मचारी वगळता बाकी कर्मचारी कामाच्या ठिकाणी तर राहतच नाही. त्याचा परिणाम वीज नियंत्रणावर होत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या धान पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पाच-पाच दिवस कृषी पंपाचा विद्युतपुरवठा बंद राहत असून विद्युत कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करून देत नाही.

विद्युत कर्मचारी मुख्यालयी रहावेत म्हणून वैरागड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यासाठी एक आणि विद्युत कर्मचाऱ्यांसाठी आठ ते दहा सर्व सोयींनीयुक्त क्वाॅर्टर बांधण्यात आले होते. पूर्वी येथील विद्युत कर्मचारी या ठिकाणी मुख्यालयात राहत हाेते; मात्र मागील आठ ते दहा वर्षांपासून या ठिकाणी कर्मचारी राहत नसल्यामुळे मुख्यालयातील या वसाहतीची दुरवस्था झाली असून झाडाझुडपांचा वेढा बसला असून याबाबत विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

बॉक्स....

साहेब म्हणतात, बिल दाखवा...

मागील चार-पाच दिवसांपासून ज्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद आहे. ते कार्यालयात जाऊन आपली तक्रार कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांकडे करीत आहेत. दरम्यान, नव्याने रुजू झालेले येथील कनिष्ठ अभियंता मात्र शेतकऱ्यांना आधी बिल दाखवा, नंतरच विद्युत पुरवठा सुरू करू, अशी भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना बिल भरूनही या सगळ्या घडामोडीत तीन-चार दिवस विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जात नाही. संबंधित शेतकऱ्याने बिल भरले की नाही हे आपल्या कार्यालय संगणक प्रणालीवर कनिष्ठ अभियंता बघू शकतात पण शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांची तक्रार आहे.

080921\img_20210908_113617.jpg

फोटो... कर्मचार्‍याच्या वसाहतीलाझाडा झुडपांचा वेडा

Web Title: Shrubs surround the residence of electrical workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.