बायोमेट्रिक हजेरीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:56 PM2018-09-24T22:56:27+5:302018-09-24T22:57:09+5:30

कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेला नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि केवळ कोचिंग क्लासेसला जायचे, असे करणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप बसावा, यासाठी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचा महत्त्वपूणे निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला असला तरी जिल्ह्यातील बºयाच महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Side by side biometric | बायोमेट्रिक हजेरीला बगल

बायोमेट्रिक हजेरीला बगल

Next
ठळक मुद्दे३० महाविद्यालयांकडे नवीन यंत्रणा : ३५ टक्के महाविद्यालयांचा शासन निर्णयाला खो

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेला नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि केवळ कोचिंग क्लासेसला जायचे, असे करणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप बसावा, यासाठी इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचा महत्त्वपूणे निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला असला तरी जिल्ह्यातील बºयाच महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान शाखेचे सर्व व्यवस्थापनाचे मिळून एकूण ४५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी ३० महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित १५ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी कागदावर घेतली जात आहे.
विज्ञान शाखेचे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर नियमित वर्गांमध्ये उपस्थित न राहता, कोचिंग क्लासमध्ये जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. याला प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पध्दतीने घेण्याचा निर्णय १५ जून २०१८ रोजी घेण्यात आला.
जिल्ह्यातील ३० महाविद्यालयांनी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली असून यातील २० ते २५ कनिष्ठ महाविद्यालये या पध्दतीची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे. बायोमेट्रिक पध्दती तपासणीचे अधिकार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक यांना देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत याबाबतचा अहवाल गट शिक्षणाधिकाºयांमार्फत मागविण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारचा अहवाल निम्म्याच महाविद्यालयांनी सादर केला असल्याची माहिती आहे.
गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, मुलचेरा, आलापल्ली, अहेरी येथे बायोमेट्रिक पध्दतीची अंमलबजावणी नियमित व काटेकोर केली जात आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोमेट्रिक पध्दतीला विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांनी फाटा दिल्याचे दिसून येत आहे.
ज्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक पध्दती कार्यान्वित केली आहे, अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी वाढली असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत याबाबत कठोर पावले उचलली तर सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
संचमान्यता प्रक्रियेत होणार अडवणूक
कनिष्ठ महाविद्यालये चालविणाऱ्या संबंधित संस्थेला दरवर्षी तुकडीची संचमान्यता घ्यावी लागते. यावर्षीचे संचमान्यता शिबिर माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आॅक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना बायोमेट्रिक पध्दती अनिवार्य असल्याने अशी पध्दती कार्यान्वित केलेल्या महाविद्यालयाची संचमान्यता होणार आहे. ज्या महाविद्यालयाने बायोमेट्रिक पध्दती कार्यान्वित केली नाही. अशा महाविद्यालयांची संचमान्यता वाद्यांत येण्याची शक्यता आहे. तसे धोरण शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
कोचिंग क्लासेसमध्येही बायोमेट्रिक?
जिल्हा व तालुका मुख्यालयी निवासी राहून अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण व इतर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यातील काही कोचिंग क्लासेसमध्ये बायोमेट्रिक मशीन नेऊन त्या ठिकाणी हजेरी नोंदविण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, बायोमेट्रिक पध्दतीनेच आमची हजेरी होत असल्याचे काही कोचिंग क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

Web Title: Side by side biometric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.