समान शिक्षण प्रत्येकाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:27 AM2017-09-11T00:27:03+5:302017-09-11T00:27:20+5:30

सर्वांना शिक्षण देणे ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे. हे शिक्षण समान असायला हवे.

Similar Education Everyone's Rights | समान शिक्षण प्रत्येकाचा हक्क

समान शिक्षण प्रत्येकाचा हक्क

Next
ठळक मुद्देप्रकाश इंगळे यांचे प्रतिपादन : सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वांना शिक्षण देणे ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे. हे शिक्षण समान असायला हवे. त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये असे प्रतिपादन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित विद्यार्थी संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रोहिदास राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाणा विद्यापीठाचे डॉ. संतोष सुरडकर, प्रा. प्रकाश दुधे, निकेश कार्तीक, अमरदिप वानखेडे, सचिन शिराळे, हंसराज बडोले, बाळू टेंभूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी संघर्षरत राहिले आहे. यापुढे हा संघर्ष चालू राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने पुढे यावे असे प्रतिपादन प्रा. इंगळे यांनी केले. शिक्षण ही मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक बाब आहे. मानवी व संवैधानिक मुल्यांवर आधारित असावे अशी भूमिका डॉ. सुरडकर यांनी मांडली. फुले शाहू आंबेडकरी विचाराने मार्गक्रमन केल्यास विद्यार्थ्यांचा विकास होईल. अध्यक्षीय भाषणात रोहिदास राऊत यांनी शिक्षणाचे राष्टीयीकरण करून त्यावरील बजेटमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याची मागणी केली. सर्वच शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक सुविधा आणि तज्ञ व पुरेसा शिक्षकवर्ग नेमण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तेव्हाच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असे प्रतिपादन केले. संमेलनात विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.या समस्या सोडविण्साठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक राहूल दुर्गे, संचालन प्रा. राजन बोरकर तर आभार पितांबर मडावी यांनी मानले. अमोल सिरसाट, राजकुमार दामोधर, सचिन डोंगरे उपस्थित होते.

Web Title: Similar Education Everyone's Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.