वर्षभरापासून सिराेंचा येथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:41+5:302021-01-01T04:24:41+5:30
काैसर खान सिराेंचा : वर्भभरापूर्वी सिराेंचा बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली हाेती. मात्र लाॅकडाऊनमुळे बसस्थानकाचे काम थांबविण्यात आले. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता ...
काैसर खान
सिराेंचा : वर्भभरापूर्वी सिराेंचा बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली हाेती. मात्र लाॅकडाऊनमुळे बसस्थानकाचे काम थांबविण्यात आले. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतरही अजूनपर्यंत कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे जुन्याच बसस्थानकातून काम चालवावे लागत आहे.
गाेदावरी व प्राणहिता नद्यांवर पूल झाल्यापासून छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वाहनांची वर्दळ वाढली आहे. तेलंगणा राज्यातून दरदिवशी सुमारे ३० बसेस सिराेंचा येतात. तसेच नागपूर, ब्रम्हपुरी, गडचिराेली, अहेरी आगाराच्या जवळपास २० बसेस सिराेंचा येथे येतात. एसटीने सुमारे २ काेटी ७० लाख सिराेंचा बसस्थानकासाठी मंजूर केले आहेत. मागील वर्षी बसस्थानकाचे काम सुरू करण्यात आले. पायव्यापर्यंतचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मात्र काेराेनामुळे केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. परिणामी बसस्थानकाचे काम ठप्प पडले.
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बसस्थानकाचे काम सुरू हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र अजूनपर्यंत कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. जुने बसस्थानक अतिशय लहान आहे. त्यामुळे प्रवाशांना जागा पुरेशी हाेत नाही. काही प्रवाशांना ऊन व पावसात थांबून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तेलंगणा राज्यातील अनेक प्रवाशी सिराेंचा येथे येतात. तेलंगणा राज्यातील बसस्थानके अतिशय चांगले आहेत. त्या तुलनेत सिराेंचाचे बसस्थानक जुने आहे. तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत असल्याचे सांगितले जाते. मात्र बसस्थानकाची अवस्था वाईट असल्याने महाराष्ट्रबाबतचा चुकीचा संदेश तेलंगणा राज्यातील नागरिकांमध्ये जात असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स...
दरदिवशी तेलंगणातील ३० बसेस येतात सिराेंचात
सिराेंचा तालुक्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. सिराेंचा तालुक्यातील नागरिक व तेलंगणा राज्यातील नागरिकांची संस्कृती एक आहे. राेटीबेटी व्यवहार हाेतात. त्यामुळे दरदिवशी तेलंगणातील शेकडाे नागरिक सिराेंचात बसने येतात. प्राणहिता व गाेदावरी नदीवर पूल झाल्यामुळे बसेसची संख्या वाढली आहे. तेलंगणा राज्यातून दरदिवशी ३० बसेस सिराेंचासाठी साेडल्या जातात. छत्तीसगड राज्यातूनही खासगी बसेस सिराेंचात येतात. त्यामुळे प्रवाशांची या बसस्थानकावर नेहमीच वर्दळ राहते. नागपूर, ब्रम्हपुरी, गडचिराेली, अहेरी आगारामधून सुद्धा सिराेंचासाठी अनेक बसेस साेडल्या जातात.
बाॅक्स....
डुकरांचा हैदाेस
बसस्थानकात माेकाट जनावरे व डुकरांचा हैदाेस राहते. बसस्थानक परिसरात असलेल्या झाडांमध्ये दिवसभर जनावरे बसून राहतात. त्यामुळे प्रवाशांना झाडाखाली थांबणे कठीण झाले आहे. येथील मूत्रिघरांची अवस्था अतिशय वाईट आहे. नवीन बसस्थानकाच्या कामासाठी अर्धा बसस्थानक टिन लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अर्धे बसस्थानक शिल्लक आहे. डांबर नसल्याने धुळीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
काेट...
लाॅकडाऊनमुळे बसस्थानकाचे काम थांबले आहे. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने बांधकाम सुरू हाेणे अपेक्षित हाेते. मात्र अजूनपर्यंत बांधकाम सुरू झाले नाही. बांधकामासाठी एसटीकडे स्वतंत्र सिव्हील विभाग आहे. या विभागाने बांधकाम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा.
- अकबर सय्यद, आगारप्रमुख
...........
नवीन बसस्थानकाचे काम झाल्याशिवाय येथील समस्या सुटणार नाही. एसटीने निधी उपलब्ध करून दिला आहे. कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण करावे. विद्यमान कंत्राटदार काम करण्यास तयार नसेल त्याच्याकडून काम काढून ते दुसऱ्याला द्यावे. काेणत्या परिस्थितीत वेळेत काम पूर्ण करावे.
- अंकुश बांबाेळे, प्रवासी
...............
सिराेंचा येथे छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील अनेक प्रवाशी येतात. मात्र सिराेंचातील बसस्थानक चांगले नसल्याने चुकीचा संदेश प्रवाशांमध्ये जाते. बसस्थानकावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसस्थानकाची निर्मिती करावी.
- रामक्रिष्णा कामार्लावार, प्रवासी