सिरोंचा-पातागुडम मार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:48 PM2018-06-12T23:48:09+5:302018-06-12T23:48:09+5:30

सिरोंचा-पातागुडम मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत.

 Sironcha-Patagunda road paved | सिरोंचा-पातागुडम मार्ग खड्डेमय

सिरोंचा-पातागुडम मार्ग खड्डेमय

Next
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : पूल व मेडिगड्डा प्रकल्पाच्या कामामुळे वर्दळ वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा-पातागुडम मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले आहेत.
सिरोंचापासून मेडिगड्डा प्रकल्प २४ किमी अंतरावर आहे. तर पातागुडम हे गाव ५६ किमी अंतरावर आहे. मेडिगड्डा प्रकल्पाचे काम तेलंगणा सरकारच्या वतीने केले जात आहे. पातागुडम येथे पूल निर्मितीचेही काम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी साहित्याची ने-आण करण्यासाठी या मार्गाने सिरोंचा मार्गाने मोठमोठे अवजड ट्रक ये-जा करतात. सिरोंचात सोमवारी, अंकिसात मंगळवारी व आसरअल्लीत शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या तीन बाजारांच्या दिवशी वाहनांची मोठी वर्दळ राहते. याच मार्गाने आसरअल्लीजवळील सोमनूर संगम पाहण्यासाठी अनेक पर्यटक ये-जा करतात. एकंदरीतच दुचाकी, चारचाकी, सायकलस्वार, पायदळ व अवजड वाहनांची या मार्गावरून नेहमी वर्दळ राहते. वाहनांच्या वर्दळीमुळे सदर मार्ग प्रचंड प्रमाणात उखडला आहे. डांबरवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपर्यंत मार्गाची दुरूस्ती झाली नाही. पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या आणखी गंभीर झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. एखादे जड वाहन या ठिकाणावरून गेल्यानंतर सभोवताल पाणी उडते. यामुळे दुचाकीस्वार किंवा सायकलस्वार ओलेचिंब होत आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
 

Web Title:  Sironcha-Patagunda road paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.