सिरोंचा महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:57+5:302021-07-28T04:37:57+5:30

निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा - अहेरी - भामरागड - एटापल्ली हे तालुके आताही विकासापासून वंचित आहेत. या क्षेत्रासाठी ...

Sironcha should be investigated for poor workmanship on the highway | सिरोंचा महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी

सिरोंचा महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी

Next

निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा - अहेरी - भामरागड - एटापल्ली हे तालुके आताही विकासापासून वंचित आहेत. या क्षेत्रासाठी आष्टी - आलापल्ली - सिरोंचा या २०० किमीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. या रस्त्याचे काम यश कंपनी, नांदेड यांना देण्यात आले. पण, हे काम दर्जाहीन केले. त्यामुळे चार ते पाच महिन्यांच्या आतच रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले. परिणामी मोटारसायकलचे बरेच अपघात झाले आहेत. त्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

या रस्त्याबद्दल वारंवार तक्रारी झाल्या. पण, त्या कंत्राटदाराला कोणतीही ताकीद दिली नाही, याउलट रस्त्यावर ४० लाख रुपयांचा निधी रस्ता दुरुस्तीसाठी मंजूर करून घेतला. हे काम गुप्ता कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदारानेसुध्दा या रस्त्यावर थातुर-मातुर कामे करून लाखाेंच्या निधीची उचल केली. आजही हा रस्ता त्याच स्थितीत आहे. दाेषी अभियंत्यांवर कारवाई करण्यासाठी आंदाेलन करणार असल्याचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुश्ताक हकीम यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Sironcha should be investigated for poor workmanship on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.