एसटी कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:09 AM2017-10-18T00:09:20+5:302017-10-18T00:09:30+5:30

गडचिरोली : वेतनवाढ करावी या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले.

 The situation of passengers by the end of ST employees | एसटी कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाºयांच्या संपाने प्रवाशांचे हाल

Next
ठळक मुद्देखासगी वाहनांचा घ्यावा लागला आधार : ऐन वेळेवर तिकीटात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : वेतनवाढ करावी या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे राज्यभरातील बससेवा मंगळवारी दिवसभर पूर्णपणे बंद होती. याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. दामदुप्पट पैसे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
वेतनवाढ करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात गडचिरोली व अहेरी आगरातीलही एसटी कर्मचाºयांनी सहभाग घेतला. सकाळी ६ वाजताच बसस्थानक परिसरात सर्व चालक व वाहक गोळा झाले. शासनाच्या विरोधात धरणे देण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीचा सण असल्याने अनेक प्रवाशी बसस्थानकात येत होते. मात्र बसस्थानकात एकही बस दिसत नसल्याने आश्चर्यचकीत होऊन विचारत होते. कामबंद आंदोलन सुरू असल्याचे कळताच ते खासगी वाहनांकडे वळत होते.
गडचिरोली शहरातील चारही मार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. ६५ वर्षांवरील नागरिकांना अर्ध्या तिकीटाचा लाभ दिला जातो. मात्र संपाबाबतची माहिती नसल्याने सदर नागरिक कित्येक तास बसची वाट बघत होते. संपाविषयी माहीत झाल्यानंतर मात्र खासगी वाहनांचा आधार घेत त्यांनी पुढचा प्रवास केला.
विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागात खासगी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे या नागरिकांना एसटीचाच आधार घ्यावा लागतो. ग्रामीण भागातून प्रवाशी मिळत नाही. या कारणास्तव खासगी प्रवाशी वाहनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. दिवाळीच्या सणानिमित्त अनेक नागरिक गडचिरोली येथे येऊ इच्छीत होते. मात्र एसटीच्या बंदचा फटका त्यांना बसला. गडचिरोली बसस्थानकात दुपारच्या सुमारास शुकशुकाट पसरला होता. बसस्थानकात केवळ चालक, वाहक व एसटीच्या कर्मचाºयांची गर्दी दिसून येत होती. आगारात एसटी वाहनांची रांग लागली होती.
चंद्रपूरची तिकीट ७० वरून ९० रूपये
खासगी बसचालक आजपर्यंत चंद्रपूरसाठी ७० रूपये तिकीट आकारत होते. बस बंद असल्याचा गैरफायदा उचलत ७० रूपयांची तिकीट ९० रूपये एवढी केली. बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलास्तव तेवढी किंमत देऊन जावे लागत होते. काही ट्रॅव्हल्सचे कंडक्टर प्रवाशांना वाढलेल्या तिकीटाविषयीची माहिती न देता आपण बरोबरच तिकीट घेऊ असे, सांगत होते. मात्र बसमध्ये बसल्यानंतर आगाऊची तिकीट घेतल्याचा अनुभव अनेक प्रवाशांनी सांगितला आहे. आरमोरी मार्गावरील वाहनधारकांनी मात्र तिकीटवाढ केली नव्हती. आरमोरी व नागपूरची तिकीट तेवढीच होती.

चंद्रपूरची तिकीट ७० वरून ९० रूपये
खासगी बसचालक आजपर्यंत चंद्रपूरसाठी ७० रूपये तिकीट आकारत होते. बस बंद असल्याचा गैरफायदा उचलत ७० रूपयांची तिकीट ९० रूपये एवढी केली. बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलास्तव तेवढी किंमत देऊन जावे लागत होते. काही ट्रॅव्हल्सचे कंडक्टर प्रवाशांना वाढलेल्या तिकीटाविषयीची माहिती न देता आपण बरोबरच तिकीट घेऊ असे, सांगत होते. मात्र बसमध्ये बसल्यानंतर आगाऊची तिकीट घेतल्याचा अनुभव अनेक प्रवाशांनी सांगितला आहे. आरमोरी मार्गावरील वाहनधारकांनी मात्र तिकीटवाढ केली नव्हती. आरमोरी व नागपूरची तिकीट तेवढीच होती.
या मागण्यांसाठी केले जात आहे कामबंद आंदोलन
नियमानुसार दर चार वर्षांनी एसटी कर्मचाºयांचा वेतन करार होणे आवश्यक आहे. मागील करार १ एप्रिल २०१६ रोजी संपला आहे. दीड वर्षांचा कालावधी उलटूनही शासनाने करार केला नाही. राज्यातील शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतनश्रेणी, भत्ते, सेवा देण्यात याव्या, १ जुलै २०१६ पासून वाढीव ७ टक्के महागाई भत्ता तसेच जानेवारी २०१७ पासून वाढीव ४ टक्के महागाई भत्ता द्यावा, संप, बंद आंदोलन, उपोषण आदींसाठी गैरहजर राहणाºया कर्मचाºयांच्या वेतन कपातीचे परिपत्रक रद्द करावे, वाहकांची अपहार प्रकरणे तडजोडणी करून निकाली काढण्याचे परिपत्रक रद्द करावे, कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास प्रवाशाप्रमाणे १० लाख रूपये तसेच मृत कर्मचाºयाच्या पाल्यास अनुकंपातत्त्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी, चालक-वाहकांचे ड्यूटी अलोकेशन संगणकीकृत करावे, चालक-वाहक व इतर कर्मचाºयांकरिता रजा व्यवस्थापन संगणकीकृत करावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रूटी दूर कराव्या, सर्व यांत्रिक कर्मचाºयांना ग्रेडेशनचा फायदा द्यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Web Title:  The situation of passengers by the end of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.