डुकर शिकार प्रकरणी सहा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:37+5:302021-05-10T04:37:37+5:30
रानडुकराची शिकार करून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोनसरीचे ...
रानडुकराची शिकार करून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोनसरीचे क्षेत्रसहायक व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पाहणी केली. सदर मास जंगली डुकराचे आढळले. याप्रकरणी आरोपींचा शोध घेऊन सहा आरोपींना अटक करण्यात आली. ही घटना शनिवारला घडली. अटक केलेल्या आराेपींमध्ये अमिश आनंद मंडल, रा. बहादूरपूर, चांद्रजित चिता मंडल, रा. बहादूरपूर, संदीप भैयाजी गुरनुले, रा. कोनसरी, करण संजय गुरनुले, रा. कोनसरी, आकाश राजू कावळे, रा. कोनसरी, बबलू चितरंजन बैद्य, रा. बहादूरपूर यांचा समावेश आहे. या सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी शिकार करुन विक्री करण्याची कबुली दिली. या सहाही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८(आ), ५० व ५१ अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपींना रविवारला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा पुढील तपास आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, सहायक वनसंरक्षक (तेंदू) एस.पी. पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. निर्मळ यांचे नेतृत्वात एस. खापरे, आर.पी. ठाकरे, आर. दांडीकवार, एस. हजारे, एम. सडमेक, जे. गोवर्धन, एम. कोकणारे, व्ही आगरे, पी. मेश्राम करीत आहेत.