आमगाव येथे सहा जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:46 PM2018-03-25T22:46:23+5:302018-03-25T22:46:23+5:30

रामनवमीचे औचित्य साधून आमगाव येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण सहा जोडपी विवाहबध्द झाली.

Six couples married at Aamgaon | आमगाव येथे सहा जोडपी विवाहबद्ध

आमगाव येथे सहा जोडपी विवाहबद्ध

Next
ठळक मुद्दे१९९९ पासून उपक्रम : आजपर्यंत सुमारे १०५ जोडप्यांचे लागले लग्न, इतर गावांसाठी प्रेरणादायी उपक्रम

आॅनलाईन लोकमत
देसाईगंज : रामनवमीचे औचित्य साधून आमगाव येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण सहा जोडपी विवाहबध्द झाली.
या विवाह सोहळ्याला आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नाना नाकाडे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच योगेश नाकतोडे, पं.स. सदस्य रेवता अलोणे, शेवंता अवसरे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, सतपाल नागदेवे, ईश्वर कुमरे, लोकमान पिलारे, सावंगीचे सरपंच राजू बुल्ले, भाग्यवान खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री हनुमान बहुउद्देशीय सेवा समिती आमगावच्या वतीने सन १९९९ पासून राम नवमीनिमित्त सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. या विवाह सोहळ्यात आतापर्यंत १०५ जोडपी विवाहबध्द झाले आहेत. आमगाव येथील राम मंदिर आमराईने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहे. या विवाह सोहळ्याचे आयोजन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण देशमुख, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विनोद जक्कमवार यांच्या संकल्पनेतून केले जात आहे. रामनवमीनिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून जपली जात आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. आमगाव येथील या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याने याचा फायदा समाजाला होतो. अशा प्रकारचे उपक्रम इतरही गावांनी राबवावे. यामुळे लग्नांवर होणारा अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले. लग्न मंडपाच्या परिसरात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक लावण्यात आले होते. सदर फलक लक्ष वेधून घेत होते.

Web Title: Six couples married at Aamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.