सहा गावातील मजुरांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:07 AM2018-10-13T01:07:30+5:302018-10-13T01:08:23+5:30

वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला.

Six District laborers hit the District Collectorate | सहा गावातील मजुरांची जिल्हा कचेरीवर धडक

सहा गावातील मजुरांची जिल्हा कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वर्षभरापासून तेंदूपत्त्याची मजुरी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात लगबगीने कार्यवाही करून दिवाळीपूर्वी मजुरीची रक्कम अदा करावी, अशी मागणी मजुरांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
राष्टÑवादी काँग्रेस पार्टी तालुका एटापल्लीच्या नेतृत्वात अनेक मजुरांनी थेट गडचिरोली गाठली. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन त्यांच्याशी प्रलंबित मजुरीबाबत चर्चा केली. सदर मजूर राकाँचे एटापल्ली तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी बुर्गी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामा तलांडे, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष गोसू हिचामी, सैतू रावळे, पोलीस पाटील चंदू गावळे, पेसा ग्रामकोष समितीचे अध्यक्ष मधुकर आत्राम, कोलू तलांडी, बुर्गीचे ग्रा.पं.सदस्य ओकटू ओंडरे, मधुकर पुंगाटी, केसरी गावडे, हरिदास दुर्गे, कटिया परसा आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, २०१७ च्या तेंदू हंगामात एटापल्ली तालुक्यातील बुर्गी, मरकल, मरकल टोला, पैमा, करफानफुंडी व अबनपल्ली आदी सहा गावांतील आदिवासी बांधवांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम केले. कंत्राटदाराशी करार करून तेंदूपत्ता तोडण्याचे काम केले. परंतु सदर एकाही मजुरांना आजतागायत एक रूपयाही मजुरीच्या पोेटी मिळाला नाही. आज ना उद्या मजुरीची रक्कम मिळेल, या आशेने अनेक मजुरांनी आपल्या दैैनंदिन गरजा भागविण्यासाठी कर्ज सुद्धा काढले. मात्र मजुरीची रक्कम न मिळाल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ न शकल्याने मजूर आता अडचणीत सापडले आहेत. सदर प्रकरणावर तोडगा काढून मजुरीची रक्कम त्वरित अदा करण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
बुर्गी गावातील मजुरांची ९ लाख २१ हजार ३६६ रूपयांची रक्कम मिळणे शिल्लक आहे. मरकल व मरकल टोला या गावातील ३ लाख ९० हजार २२८, पैमा गावातील मजुरांची २ लाख २० हजार ९४०, करफानफुंडी गावातील मजुरांचे ४ लाख १९ हजार ३१८ व अबनपल्ली गावातील मजुरांची ७ लाख ६६ हजार १५० रूपये प्रलंबित आहे. बोनस व मजुरीची मिळून एकूण ५० लाख २५ हजार रूपये प्रलंबित आहेत.
तेंदूपत्ता कंत्राटदार कारागृहात
मुर्गी, मरकल, मरकल टोला, पैमा, करफानफुंडी व अबनपल्ली आदी सहा गावांतील नागरिकांनी तेंदू संकलन केलेल्या तेंदू युनिटचा कंत्राट परशुराम डोंगरे नामक कंत्राटदारांनी घेतला. डोंगरे यांच्याशी तेंदूपत्ता संकलनाचा करारही करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी कंत्राटदार डोंगरे यांना अटक केली. कंत्राटदार सध्या कारागृहात आहे. या कारणामुळेच तेंदूपत्ता संकलन करणाºया मजुरांना कामाच्या मजुरीची रक्कम मिळू शकली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. कंत्राटदार कारागृहात असल्याने मजुरी कशी मिळेल, असा सवाल मजुरांनी उपस्थित करून यावर जिल्हा प्रशासनाने काही तरी तोडगा काढावा, अशी विनंतीही या मजुरांनी केली आहे.

Web Title: Six District laborers hit the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा