आलदंडीत सहा भरमार रायफली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:50 PM2017-10-02T23:50:02+5:302017-10-02T23:50:16+5:30

गांधी जयंतीचे औचित्य साधून एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथील गावकºयांनी सहा भरमार रायफली पोलीस मदत केंद्र आलदंडी येथे जमा केल्या आहेत.

Six heavy rifles seized in the Alliance | आलदंडीत सहा भरमार रायफली जप्त

आलदंडीत सहा भरमार रायफली जप्त

Next
ठळक मुद्देगांधी जयंतीचे निमित्त : पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गांधी जयंतीचे औचित्य साधून एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथील गावकºयांनी सहा भरमार रायफली पोलीस मदत केंद्र आलदंडी येथे जमा केल्या आहेत.
आलदंडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे यांनी आलदंडी येथील नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. ग्रामभेटी घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासन तसेच शासनाच्या इतर कर्मचाºयांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. गावात शांतता राखण्यासाठी भरमार रायफल जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपल्या जवळच्या सहा भरमार रायफल पोलिसांकडे जमा केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नक्षल्यांचा निषेध करीत त्यांना मदत न करण्याचा निश्चय केला.

Web Title: Six heavy rifles seized in the Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.