काेराेनाग्रस्त सहा लाेकांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:35 AM2021-04-12T04:35:01+5:302021-04-12T04:35:01+5:30
मृतकांमध्ये आरमोरी तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ६२, ३७, ५४ वर्षीय पुरुष, चिमुर येथील ५४ वर्षीय ...
मृतकांमध्ये आरमोरी तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ६२, ३७, ५४ वर्षीय पुरुष, चिमुर येथील ५४ वर्षीय पुरुष, गडचिरोली तालुक्यातील मानसिक आजाराने ग्रस्त ६ वर्षीय बालकाचा समावेश आहे. १०२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या १२ हजार ३९६ एवढी झाली आहे. तर १० हजार ६८७ जणांनी काेराेनावर मात केली आहे. १ हजार ५७६ सक्रिय काेराेना बाधितांवर उपचार सुरू आहेत. १३३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.२१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १२.७१ टक्के तर मृत्यू दर १.०७ टक्के झाला.
नवीन २९६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ११४, अहेरी तालुक्यातील ४१, आरमोरी १९, भामरागड १२, चामोर्शी १८, धानोरा १५, एटापल्ली ६, कोरची २८, कुरखेडा १५, मुलचेरा तालुक्यातील ७, सिरोंचा ३ तर देसाईगंज तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या १०२ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ५४, अहेरी ११, आरमोरी ११, भामरागड ७, चामोर्शी ६, धानोरा ४, मुलचेरा २, कुरखेडा २, तसेच देसाईगंज तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
बाॅॅक्स
४६ हजार नागरिकांनी घेतली लस
जिल्ह्यात काेराेनाची लस देण्याला गती देण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही लसीकरण केंद्र सुरू ठेवले जात आहेत. सध्या ६८ शासकीय व २ खासगी अशा एकूण ७० बुथवर उपचार सुरू आहे. शनिवारी २०१० नागरिकांना पहिली लस तर १८५ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ४६ हजार ९९२ नागरिकांना पहिला तर ११ हजार १०३ नागरिकांना दुसरी लस देण्यात आली आहे.