जांभळी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

By admin | Published: May 3, 2017 01:33 AM2017-05-03T01:33:50+5:302017-05-03T01:36:29+5:30

महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील जांभळी ग्राम पंचायतीला स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Smart Village Award for Jambhal Gram Panchayat | जांभळी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

जांभळी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार

Next

धानोरा : महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील जांभळी ग्राम पंचायतीला स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जांभळीच्या सरपंच रत्नमाला बावणे व सचिव के. के. कुलसंगे यांनी पुरस्कार स्वीकारला. २०१६-१७ या वर्षात जांभळी ग्राम पंचायतीने १०० टक्के शौचालय बांधले व त्याचा वापर सुरू केला. गावामध्ये शोष खड्डे निर्माण केले. शासनाने दिलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही या ग्राम पंचायतीने पूर्ण केले आहे. सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, गृहकराची १०० टक्के वसुली, प्रियासॉफ्ट आॅनलाईन रेकार्ड, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग, तंटामुक्त गाव अभियानात सक्रिय सहभाग, रोजगार हमी योजनेची कामे पूर्ण करणे आदीबाबतचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार प्रदान करतेवेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Smart Village Award for Jambhal Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.