अन् दुर्गम भागातील ‘त्या’ दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:00 AM2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:36+5:30

गरिबी आणि त्यात शारीरिक दिव्यांगत्व, यामुळे ज्यांच्या वाट्याला उपेक्षेचे जीणे आले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविण्याचे काम पोलीस विभागाने केले. तालुक्यातील लाहेरी उपपोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात या भागातील १० दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचे वितरण करण्यात आले. यासोबतच नागरिकांना हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

Smile on the faces of 'those' cripples in remote areas | अन् दुर्गम भागातील ‘त्या’ दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

अन् दुर्गम भागातील ‘त्या’ दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

Next

रमेश मारगोनवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पाचवीला पूजलेली गरिबी आणि त्यात शारीरिक दिव्यांगत्व, यामुळे ज्यांच्या वाट्याला उपेक्षेचे जीणे आले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविण्याचे काम पोलीस विभागाने केले. तालुक्यातील लाहेरी उपपोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात या भागातील १० दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचे वितरण करण्यात आले. यासोबतच नागरिकांना हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भामरागडचे एसडीपीओ नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले होते. महिला व बालविकास अधिकारी राहुल चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वीर बिरसा मुंडा  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू झाला. यावेळी लाहेरीचे प्रभारी अधिकारी आकाश विटे, ग्रामसेवक अविनाश गोरे, उपनिरीक्षक महादेव भालेराव, आश्रमशाळेचे शिक्षक पुरूषोत्तम बखर, उपनिरीक्षक विशाल पगारे आदी उपस्थित होते.
मेळाव्याकरिता उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७०० ते ८०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपनिरीक्षक  महादेव भालेराव तर, आभार प्रभारी अधिकारी आकाश विटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पगारे, पोलीस हवालदार हिचामी, पोलीस अंमलदार फिरोज घाटले, मोहिंदर मानकर, प्रमोद गडेलवार, अभिषेक पीपरे, प्रमोद गडेलवार, हमीद डोंगरे, नितीन जुवारे, उमेश कुनघाडकर, महिला  पोलीस अंमलदार चव्हाण, रेश्मा गेडाम, वैशाली चव्हाण, कल्लू मेश्राम, प्रेमिला तुलावी, शालू नामेवार, वर्षा डांगे, शारदा खोबरागडे आदींनी सहकार्य केले.

हेल्थ कार्डसह व्हॉलिबाॅल स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे
यावेळी बालविकास अधिकारी राहुल चव्हाण यांच्या हस्ते आरोग्यविषयक जागृती करत बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साड्या, १० दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांचे हेल्थ कार्ड, ई-श्रम कार्ड काढण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघांना रोख रक्कम व व्हॉलीबॉल नेट बक्षीस म्हणून देण्यात आले.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
-    असिस्टंट कमांडंट भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात जनजागरण मेळाव्याबाबत माहिती दिली. बालविकास अधिकारी चव्हाण यांनी पोलीस विभागाच्या अधीक्षकांनी विशेष काळजी घेऊन पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या योजनांचे कौतुक करून उपस्थितांना शासकीय योजनांबाबत माहिती दिली. ग्रामसेवक अविनाश गोरे यांनी विविध शासकीय
योजनांची माहिती देऊन कोरोना लस घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

Web Title: Smile on the faces of 'those' cripples in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस