चारभट्टी-पलसगड येथून सागवान पाट्यांची तस्करी
By admin | Published: October 17, 2016 02:14 AM2016-10-17T02:14:09+5:302016-10-17T02:14:09+5:30
कुरखेडावरून पाच किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी येथून सागवान पाट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.
कुरखेडा/पलसगड : कुरखेडावरून पाच किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी येथून सागवान पाट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
गोंदिया जिल्ह्यातील तिटखुटी हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या तिटखुटी गावावरून सागवानाच्या पाट्या चारभट्टी येथे पोहोचविण्यात येतात. त्यानंतर या पाट्या कुरखेडा येथे पोहोचविण्यात येत आहेत. वन विभागाचे कर्मचारी या छुप्या वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांची हिंमत वाढत चालली आहे. १४ आॅगस्टच्या रात्री १.३० वाजता पलसगड व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सागवानी पाट्या भरलेले चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन अतिशय वेगात होते. वाहनचालकाने वाहन थांबविले नाही. या मार्गाने आता दिवसा ढवळ्या तस्करी केली जात आहे. वन विभागाने या मार्गावर पाळत ठेवून संबंधित तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तस्करी करणारे वाहन अतिशय वेगात राहत असल्यामुळे या वाहनाचा पाठलाग करून पकडणे अशक्य होते. या वाहनाने होण्याची शक्यता आहे.