सापाची जोडी मिलनात बेभान, दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद
By संजय तिपाले | Published: July 4, 2023 01:56 PM2023-07-04T13:56:43+5:302023-07-04T13:59:47+5:30
व्यत्यय आल्याने गर्दीच्या दिशेने जोडीची चाल
गडचिरोली : राज्याच्या सीमेवरील शेवटच्या टोकावर व तेलंगणा सीमेवरील सिरोंचा तालुक्याला निसर्गाचे भरभरुन दान मिळालेेले आहे. ३ जुलै रोजी तालुका मुख्यालयापासून सहा किलाेमीटरवरील आरडा गावात मिलनात बेभान झालेल्या सापांचे दुर्मिळ दृश्य ग्रामस्थांना पहायला मिळाले. सर्पमिलनाा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरडा गावातील रामू रंगुवार यांच्या घराजवळ ३ जुलै रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता झुडूपात सर्पमिलनात व्यग्र असलेल्या जोडीचे दर्शन झाले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतील एकाने या जोडीच्या मिलनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिरोंचा म्हटले की डोळ्यासमोर जंगल, नदी असे मनमोहक चित्र उभे राहते. निसर्गाची भरभरुन देणगी मिळालेल्या या तालुक्यात विविध प्रजातीचे प्राणी, पक्षी आढळून येतात. यासोबतच दुर्मिळ वन्यजीव तसेच सर्पांच्याही विविध जाती आढळतात.
जून हा सर्पमिलाचा महिला मानला जातो. मिलनात व्यग्र असलेल्या या जोडीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, या गोंधळात अर्ध्या तासापासून सुरु असलेल्या त्यांच्या मिलनात व्यत्यय आला. त्यामुळे दोघांनीही गर्दीच्या दिशेने चाल केली. भीतीपोटी गर्दी पांगल्यावर ही जोडीही दृष्टीआड झाली.