..तर या जिल्ह्यातूनही अनेक खेळाडू तयार होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:48+5:302021-07-25T04:30:48+5:30
आरमाेरी : महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेकरिता उत्तमरीत्या तयारी केल्यास स्पर्धेत यश प्राप्त होईल व आपल्या जिल्ह्यामध्येसुद्धा खेळाला महत्त्व येऊन अनेक ...
आरमाेरी : महाविद्यालयातील खेळाडूंनी स्पर्धेकरिता उत्तमरीत्या तयारी केल्यास स्पर्धेत यश प्राप्त होईल व आपल्या जिल्ह्यामध्येसुद्धा खेळाला महत्त्व येऊन अनेक खेळाडू तयार होतील, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर यांनी केले.
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात २४ जुलै राेजी शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो (जपान) २०२० च्या सेल्फी पॉइंटच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के आदी उपस्थित हाेते.
या सेल्फी पॉइंटमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी, तसेच खेळाडूंनी सेल्फी काढून भारतातर्फे ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो (जपान) येथे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यात आला.
यशस्वीतेकरिता प्रा. नोमेश मेश्राम, प्रा. मोहनलाल रामटेके, डॉ. जयेश पापडकर, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. गजानन बोरकर, डॉ. गजेंद्र कढव, प्रा. पराग मेश्राम, डॉ. विजय गोरडे, डॉ. किशोर वासुर्के, प्रा. सुनील चुटे, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विशाल जौंजालकर, सारंग जांभुळे, रोहिणी जुवारे, प्रगती सेलोकर, आचल दोनाडकर आदी उपस्थित होते.