सामाजिक कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची प्रतिकृती जाळली

By दिलीप दहेलकर | Published: April 19, 2023 06:36 PM2023-04-19T18:36:34+5:302023-04-19T18:36:42+5:30

ईव्हीएम हटाओ,देश बचाओ आंदाेलनातून केला ईव्हीएमचा विरोध

Social activists burnt replica EVMs in gadchiroli | सामाजिक कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची प्रतिकृती जाळली

सामाजिक कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची प्रतिकृती जाळली

googlenewsNext

गडचिराेली : देशात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून १९ लाख ईव्हीएम मशिन गायब असुनही याबाबत निवडणुक आयाेग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. यावरून ईव्हीएमच्या आधारे मोठे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता ईव्हीएम हटाओ,देश बचाओच्या जयघोषात ईव्हीएमचा जाहिर विरोध करीत देसाईगंजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारला ईव्हीएम मशिनची प्रतिकृती जाळली. तसेच आगामी प्रत्येक निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

गुजरात विधानसभेच्या पार पडलेल्या निवडणुकीत एका बुथवर केवळ ९० मतदान असताना २७० मतदान केले गेल्याचे तसेच एका संपुर्ण गावाने बीजेपीला एकही मतदान केले नसताना तब्बल २ हजार २०० मते भाजपालाच केल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले होते. याबाबत संबंधित मतदारांनी निवडणूक आयाेगाकडे तक्रार करून अद्यापही दखल घेण्यात आली नाही. वारंवार बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडे ईव्हीएम मशिन सापडत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल करण्यात येत असल्याने ईव्हीएमच्या माध्यमातून देशाच्या नागरिकांना मुर्ख बनविण्याचे काम सुरु असल्याचा आराेप यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

इव्हिएम हटाओ, देश बचाव हे आंदोलन पवन गेडाम यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पिंकू बावणे, प्रदीप लाडे, प्रवीण राऊत, दीपक मेश्राम, मंगल रामटेके, चिराग बनकर, मनोज सुखदेवे, चक्रधर पारधी, खुशाल घुटके, सुनिता राऊत, शालू बनसोड, सुरबा नाकतोडे, मीना प्रधान,लता मेश्राम आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरीक उपस्थित होते.

Web Title: Social activists burnt replica EVMs in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.