राजकारणापेक्षा समाजसेवा महत्त्वाची
By admin | Published: June 1, 2016 02:05 AM2016-06-01T02:05:50+5:302016-06-01T02:05:50+5:30
गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली.
गडचिरोलीत नागरी सत्कार : कीर्तिकुमार भांगडिया यांचे प्रतिपादन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली. जनता व कार्यकर्त्यांच्या सहकार्यांमुळेच राजकारण व समाजकारणात यशाचे शिखर गाठता आले. राजकारणापेक्षा समाजसेवा करण्यावर भर दिला आहे. आमदारकीची संधी जनतेने आपल्याला उपलब्ध करून दिली. या संधीला तडे जाऊ न देता कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन आ. कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले.
आ. बंटी भांगडिया यांचा गडचिरोली शहरात त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला मित्र परिवारातील कार्यकर्ते अरविंद कात्रटवार, भूपेश कुळमेथे, सचिन बोबाटे, तेजस नरड, सुनील गभणे, राहुल सोरते, संदीप दुधबळे, सुनील नक्षिणे, मिलिंद भानारकर, महेश येनप्रेडिवार, संजय बोबाटे, दर्शन पोगलवार, राहूल निलमवार, अजय गोरे, सतीश त्रिनगरीवार, इंद्रपाल गहाणे, आशिष नक्षिणे, होमराज लेनगुरे, राजकुमार मोहुर्ले, मिथून नैताम, गणेश नैताम, सूरज कावळे, अनिकेत सिडाम, रोशन नैताम, धनराज सहारे, सुधीर लाडे, खुशाल साखरे, विनोद नैताम, अजय सहारे, बंडू लोनबले, हिंमत खरवडे, दीपक नंदेश्वर, केविन सहारे, शंकर कन्नमवार, यशवंत पिपरे, महेश भुरले, सोनू लाडे प्रशांत सोरते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मित्र परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)