समाज संघटन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:21 AM2017-09-12T00:21:10+5:302017-09-12T00:21:23+5:30
शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. समाजातील समस्यांचे निराकरण करुन प्रगती साध्य करायची असेल तर ‘मन जोडो, समाज जोडो’ यानुसार समाज संघटन वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक आक्केवार यांनी केले.
शिंपी समाजाच्या वतीने रविवारी स्थानिक संस्कृती सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय पहिल्या शिंपी समाज परिषदचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंदू वडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष राजेश वडपल्लीवार, राज्य सरचिटणीस विजय आक्केवार, उपाध्यक्ष राजेश टापते, अॅड. राजेंद्र गटलेवार, संतोष शनगरवार, प्रशांत गटलेवार, दीपक कोटुरवार, प्रशांत राजूलवार, संदीप शिवरामवार, संजय सिंगेवार, अरविंद ओझलवार, प्रदीप कर्णेवार, जितेंद्र राणशिरवार, संजय दिकोंडवार, डॉ. दीपक कोटुरवार, आशिष मंथनवार, आशिष कनपूरवार, नामदेव गंदेवार, गणपत वडपल्लीवार, प्रशांत मुप्पीडवार, रवींद्र गंदेवार, दादाजी नंदगिरवार, श्यामसुुंदर आक्केवार भास्कर वडपल्लीवार आदी उपस्थित होते.
शिंपी समाज परिषदेच्या उद्घाटनानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘शिंपी समाजाला संघटनाची कशी व का आवश्यता आहे’ यावर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. परिषदेच्या दुसºया सत्रात परिसंवादातून एलआयसीचे शाखा व्यवस्थापक सुधीर रामगिरवार यांनी समाज संघटनेस प्रत्येकाने सहकार्य करुन समाजातील विस्कटलेली घडी रूळावर आणण्यासाठी राज्य संघटनेस पाठींबा दर्शवावा, असे विचार व्यक्त केले. प्रा. रमेश मुनगंटीवार यांनी ध्येयपूर्ण कृतिशील नेतृत्व व सर्जनशील मार्गदर्शकाची गरज असून भविष्याचा वेध घेत समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाज संघटन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, नयना वडपल्लीवार तर आभार प्रवीण रामगिरवार यांनी मानले.