समाज बांधवांनी संघटीत व्हावे

By admin | Published: December 27, 2016 01:52 AM2016-12-27T01:52:43+5:302016-12-27T01:52:43+5:30

आदिवासी हलबा-हलबी समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी

Society should be organized by the brothers | समाज बांधवांनी संघटीत व्हावे

समाज बांधवांनी संघटीत व्हावे

Next

मिताराम कुमरे यांचे प्रतिपादन : बेलगावात हलबा-हलबी समाज मेळावा
धानोरा : आदिवासी हलबा-हलबी समाज अद्यापही विकासापासून वंचित आहे. आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी हलबा-हलबी समाज बांधवांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील माजी पोलीस उपायुक्त मिताराम कुमरे यांनी केले.
आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना जिल्हा शाखा गडचिरोली व समाज कर्मचारी संघटना शाखा मुरूमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक एकता व शक्ती दिनानिमित्त तालुक्यातील बेलगाव येथे सोमवारी हलबा-हलबी समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शालिक मानकर होते. प्रमुख अतिथी म्हणून एफ. आर. कुतीरकर, माधव गावळ, प्राचार्य टी. ओ. भोयर, पन्नेमाराच्या सरपंच शेवंता हलामी, बेलगावच्या माजी सरपंच भैसारा, एम. जे. दिहारे, एल. आर. कोंबे आदी उपस्थित होते. हलबा-हलबी आदिवासी समाजाने मनात जिद्द बाळगून शैक्षणिक व सामाजिक क्रांती करावी, असे कुतीरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिराम रावटे, संचालन एस. आय. चिराम यांनी केले तर आभार दयाराम कवलिया यांनी मानले. याप्रसंगी बेलगाव येथील जय शितलामाला जस झाकी पार्टी तर्फे उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी इतर उपस्थित मान्यवरांनीही मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हलबा-हलबी समाज संघटना शाखा मुरूमगावच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच बेलगाववासीयांनी सहकार्य केले.

Web Title: Society should be organized by the brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.