समाज मंदिर ज्ञान मंदिर बनावे
By Admin | Published: January 8, 2017 01:30 AM2017-01-08T01:30:54+5:302017-01-08T01:30:54+5:30
आता प्रत्येक समाजाचे समाज मंदिर असणे गरजेचे झाले आहे. मात्र समाज मंदिराच्या माध्यमातून ज्ञानपुरक कार्य करून ज्ञान मंदिर बनावे
आनंदराव गेडाम यांचे प्रतिपादन : आजी व माजी आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन
कुरखेडा : आता प्रत्येक समाजाचे समाज मंदिर असणे गरजेचे झाले आहे. मात्र समाज मंदिराच्या माध्यमातून ज्ञानपुरक कार्य करून ज्ञान मंदिर बनावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे बांधण्यात आलेल्या माळी समाज मंदिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम निकोडे, जि.प. सदस्य वर्षा गावतुरे, पंस. सदस्य महादेव नाकाडे, प्रा. डॉ. दशरथ आदे, सरपंच चंद्रकांत चौके, माजी पं.स. उपसभापती डॉ. दुर्गादास आकरे, उपसरपंच दमयंती सहारे, पोलीस पाटील राजेंद्र आकरे, युवराज मरस्कोल्हे, फाल्गुन नारनवरे, बाबुराव जेंगठे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंढरी रंधये, किरण आकरे, भाग्यवान टेकाम, कालिदास वाटगुरे, पुरूषोत्तम दडमल, पिंगला नारनवरे, नामदेव नारनवरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे यांनी माळी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर राहू, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलेश्वर आदे, संचालन प्रा. देवनाथ सोनुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)