सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली

By संजय तिपाले | Published: December 21, 2023 01:25 PM2023-12-21T13:25:49+5:302023-12-21T13:26:19+5:30

अन्न प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी घेतले नमुने

Sode's ashram school 17 more people were poisoned | सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली

सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली

गडचिरोली: तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत २० डिसेंबरला १०६ विद्यार्थ्यांना  दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली होती. या आश्रमशाळेतील आणखी १७ मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. २१ डिसेंबरला सकाळचा नाष्ता केल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविले. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. 
 
 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सोडे गावात  माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे.  २० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात  व गाजर खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. तब्बल १०६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ४८ तास या सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबरला सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाष्त्यात वटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर १७ विद्यार्थ्यांना मळमळ, डाकेदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून उर्वरित ७६ जण धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या घटनेने आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे काही अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

अन्न नमुने पाठवले प्रयोगशाळेत 

दरम्यान, २० डिसेंबरला अन्न नमुने तपासणीसाठी घेेतले होते, २१ रोजी पुन्हा १७ जणांना विषबाधा झाल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील स्वयंपाकघरात भेट दिली. यावेळी तेथील वटाण्याच्या उसळचे नमुने तपासणीकामी घेतले आहेत. हे नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष आहे. 
 

Web Title: Sode's ashram school 17 more people were poisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.