मातीकाम झाले, मात्र खडीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:55+5:302021-03-08T04:33:55+5:30

अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता ...

Soil work done, but waiting for paving | मातीकाम झाले, मात्र खडीकरणाची प्रतीक्षा

मातीकाम झाले, मात्र खडीकरणाची प्रतीक्षा

Next

अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरून गोलाकर्जी गावापासून २० किमी अंतरावर चिरेपल्ली गाव आहे. गावात ५०० ते ६०० लोकसंख्या आहे. सदर मार्ग गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-खांदला-पत्तीगाव-बोगागुडमवरून चिरेपल्लीकडे येतो. येथून परिसरातील नागरिक नेहमीच आवागमन करतात. तालुका मुख्यालयातील विविध कामांकरिता ये-जा करीत असतात; परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणचा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने येथे मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावर खांदलापासून चिरेपल्लीपर्यंत तीन ते चार नाले आहेत. या नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Soil work done, but waiting for paving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.