आपसी तडजोडीतून वाद सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:19 AM2018-04-26T00:19:36+5:302018-04-26T00:19:36+5:30

कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ व वारसान हक्क तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी बाबतची माहिती देऊन गावातील वाद आपसी तडजोडीतून सोडविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा,....

Solve disputes by mutual compromise | आपसी तडजोडीतून वाद सोडवा

आपसी तडजोडीतून वाद सोडवा

Next
ठळक मुद्देन्यायाधीशांचे प्रतिपादन : येवलीत कायदेविषयक शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ व वारसान हक्क तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी बाबतची माहिती देऊन गावातील वाद आपसी तडजोडीतून सोडविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) एन. पी. वासाळे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत बुधवारी येवली येथे फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता अनिल चौधरी, विधी स्वंयसेवक वैशाली बांबोळे, पोलीस पाटील लक्ष्मीछाया मेश्राम आदी हजर होते. अनिल चौधरी यांनी मुलींचे अधिकार व लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. बांबोळे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची माहिती दिली. संचालन यजमान बांबोळे यांनी केले.

Web Title: Solve disputes by mutual compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.