प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:46+5:302021-06-06T04:27:46+5:30
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शिक्षणाधिकारी नाकाडे, कक्ष अधिकारी रोहणकर, सहायक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेटीवार, शिक्षण विस्तार ...
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शिक्षणाधिकारी नाकाडे, कक्ष अधिकारी रोहणकर, सहायक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेटीवार, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रलंबित समस्यांवर चर्चा केली. याप्रसंगी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आदर्श शिक्षक समितीचे नेते अनिल मुलकलवार, दुर्गम क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कुरवटकर, शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार देवनाथ बोबाटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवेंद्र लांजेवार, संघटक रमेश साना, दिवाकर पिपरे, चामोर्शी तालुका युवा आघाडी अध्यक्ष सुजीत दास, मुलचेरा तालुका कार्याध्यक्ष अशोक बोरकुटे आदी उपस्थित होते.
चर्चेनंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रकरणे निकाली काढणे. निवडश्रेणीचा लाभ देणे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक, बांग्ला भाषिक शिक्षक यांची रिक्त पदे भरणे, मुख्याध्यापकांना शालेय आर्थिक व्यवहार करताना १ हजार रुपयांची अट रद्द करणे, पदावन्नत मुख्याध्यापकांना मूळ पदावर पदस्थापना देणे. एकूण पदवीधर शिक्षकांच्या विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी. दिव्यांग व आजारी असलेल्या ५० वर्षांवरील शिक्षकांना काेराेना कामावर घेऊ नये, आंतरजिल्हा बदलीने बाहेर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांचा सेवा नियमिततेचा प्रश्न जिल्हास्तरावरच सेवा नियमित करून सोडविण्यात यावा. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे दरमहा वेतन १ तारखेलाच करावे. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना एकाच पदावर १२ वर्षे सेवा झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्यावा. विस्तार अधिकारी (शिक्षण) पदासाठी मागेच प्रसिद्ध करण्यात आलेली यादी सदोष असल्याने ती दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात यावी. चटोपाध्याय आयोगांतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणी लागू केल्यानंतर एकस्तर पदोन्नतीच्या नावाखाली अतिरिक्त प्रदानाची वसुली थांबवावी, तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यात काम करीत असल्याने वरिष्ठ श्रेणी लागू केल्यानंतर देखील फायद्याची वेतनश्रेणी कायम ठेवावी, आदी समस्यांचा समावेश हाेता. सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
===Photopath===
050621\img-20210602-wa0085.jpg
===Caption===
गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा फोटो