शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:12+5:302021-02-08T04:32:12+5:30
गडचिराेली : गडचिराेली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पालकमंत्र्यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात ...
गडचिराेली : गडचिराेली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पालकमंत्र्यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनामध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त व आदिवासी भागात काम करण्याऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा. गडचिरोली जिल्हा परिषदेतील बडतर्फ ३८ अप्रशिक्षित शिक्षकांची सेवा पूर्ववत बहाल करण्यात यावी. गडचिरोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया लवकरात लवकर संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात यावी. सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी. जि.प.च्या प्राथमिक शिक्षकांना १०/२०/३० ची आश्वासित प्रगती योजना सरसकट लागू करण्यात यावी. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे ही ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के सरळ सेवेने भरण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.