प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:08 AM2018-12-02T01:08:51+5:302018-12-02T01:09:46+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

Solve Primary Teacher Problems | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे धरणे : जुनी पेन्शन योजना लागू करा, मुख्य सचिवांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी. २३ आॅक्टोबर २००५ पासून सेवेत आलेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी पासून व वरिष्ठ श्रेणी पास शिक्षकांना निवड श्रेणीपासून वंचित ठेवणारा २३ आॅक्टोबर २०१७ चा शालेय शिक्षण विभागाचा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा. कमी पटसंख्येच्या नावाखाली कोणतीही शाळा बंद करू नये. खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजनाने नियुक्त करू नये. त्याऐवजी सदर जागा शिक्षण शास्त्र पदविधारक बेरोजगारांमधून भरण्यात याव्यात. राज्य कर्मचाºयांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ द्यावा. प्राथमिक शिक्षकांना गट विमा योजना लागू करावी. २०१८ च्या बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या तसेच पती-पत्नी विभक्तिकरण झालेल्या शिक्षकांना समायोजनापूर्वी विनंतीनुसार समुपदेशानाने रिक्त पदांवर पदस्थापना द्यावी. आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात आल्यावरही एकत्रीकरण न झालेल्या शिक्षकांना परस्पर सहमतीने बदलीची तसेच रिक्त जागा असल्यास एकतर्फी बदलीची संधी द्यावी. कपात केलेल्या वेतनवाढी मागील लाभांसह परत मिळाव्यात. सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करावी. बीएलओसह सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना सुट देण्यात यावी. या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आदोलनांनतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाचे मुख्य सचिव यांना पाठविले.
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी केले. आंदोलनात नरेंद्र कोत्तावार, रमेश रामटेके, गणेश काटेंगे, योगेश ढोरे, रोशणी राखडे, अशोक दहागावकर, हेमंत मेश्राम, इर्शाद शेख, दीपक रामने, अरूण पुण्यप्रेडीवार, रविंद्र मुलकलवार, जयंत राऊत, मनोज रोकडे, खिरेंद्र बांबोळे, प्रेमचंद मेश्राम, अविनाश ठाकरे, सुनिल चरडुके, जीवन शिवनकर, साईनाथ अलोणे, राजेंद्र भुरसे, डंबेश पेंदाम, प्रशांत काळे, रविंद्र वासेकर, संजय लोणारे, खुशाल चुधरी, गेमदास दुधबावरे, श्रीकृष्ण नारदेलवार, कैलास टेंभूर्णे, वसंत भैसारे, नंदलाल सोरी, गणपत मंगल, अगणू गोटा, केशव पर्वते, राजू फड, हरिश्चंद्र वाघाडे, सुरेश नाईक, मनोज रोकडे, केवळराम राऊत, संतोष टिकले, अंकरशहा मडावी, किशोर सुनतकर, शेषराव संगीडवार, विलास भांडेकर, किरण ठाकरे, नरेंद्र चौधरी, धनश्री मिसार, राकेश सोनटक्के, गुलाब मने, प्रभाकर गडपायले, रवी ठलाल, सदाशिव हलामी, विठ्ठल होंडे, निलकंट शिंदे, रविंद्र घोगडे, विलास दरडे, मोरेश्वर अंबादे, सोमेश दुर्गे, एस. के. चडगुलवार, अन्वर शेख, नरेश गेडाम, गुणवंत हेडाऊ, दादाजी खरकाटे, पी. एस. बारसिंगे, रेखा गडपल्लीवार, मंदा राऊत, वैशाली कोसे, नरेंद्र म्हशाखेत्री, किरण ठाकरे, हेमलता आखाडे, अल्का अंडलकर, सारिका भोयर, अश्वीनी पंधरे, रजनी कुमरे, नंदीनी पेटकर, कमल गावडे, तारकेश्वर मडावी, किरण नरोटे, यामीनी कोवे यांच्यासह शेकडो शिक्षकांनी सहभाग घेतला.

Web Title: Solve Primary Teacher Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.