अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:04+5:302021-03-20T04:36:04+5:30
मेळाव्याला संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, उज्ज्वला उंदीरवाडे, नीलिमा माेहुर्ले, इंदूमती भांडारकर, सुशीला कार, काैशल्या गाैरकार, फकिरा ठेंगणे, अमाेल ...
मेळाव्याला संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, उज्ज्वला उंदीरवाडे, नीलिमा माेहुर्ले, इंदूमती भांडारकर, सुशीला कार, काैशल्या गाैरकार, फकिरा ठेंगणे, अमाेल मारकवार, भारती रामटेके, ललीता केदार उपस्थित हाेते.
केंद्र शासनाने २९ कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता मंजूर केल्या. कामगारांनी दीडशे वर्षे लढा देऊन मिळविलेले अधिकार शासनाने काढून घेतले. देशातील भांडवलदारांना खूश करण्यासाठी तीन कृषी कायदे मंजूर केले. त्याचबराेबर विविध विभाग केंद्र शासन खासगी लाेकांच्या हातात साेपवित आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय हाेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला नाही. तसेच अनेक पदे रिक्त आहेत. अंगणवाड्यांचे भाडे मिळाले नाही. माेबाईल प्राेत्साहन भत्ता रखडला आहे. यासह विविध समस्या प्रलंबित आहेत, असे मार्गदर्शन दहीवडे यांनी केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी लांबतुरे यांना देण्यात आले.