कोरची तालुक्यातील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:40 AM2017-09-22T00:40:42+5:302017-09-22T00:40:52+5:30
तालुक्यात विविध समस्या असल्याने विकासात तालुका मागे पडत आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यात विविध समस्या असल्याने विकासात तालुका मागे पडत आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, कोरची-कोटगूल, कोरची-मसेली, मसेली-कोटरा मार्गाचे डांबरीकरण, कोरची ते कोटरा रस्त्याची डागडुजी, कोरची-बेतकाटी, बोटेकसा मार्गाची डागडुजी, बोटेकसा-घुगवा रस्ता मंजूर करून खडीकरण करावे, कोटगूल ते वाको रस्त्याचे डांबरीकरण, देऊळभट्टी-गोटाटोला रस्त्याचे डांबरीकरण करावे. कोटगूल-गोटाटोला-कामेली-अलोंडी-रानकट्टा रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, तालुक्यातील नाल्यांवर पुलाचे बांधकाम करावे. कोरची, कोटगूल, मसेली येथे थ्री- जी, फोर-जी इंटरनेटसेवा द्यावी, तालुक्यातील कुंभकोड देवस्थानचा विकास करावा, कोरची-कोटगूल-कोटरा मार्गे दुपारी बससेवा सुरू करावी, तालुक्यातील रिक्त पदे भरावी, ग्रामीण रूग्णालयात शीतगृह, रक्तपेढी, बालरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक सेवा पुरवावी, आश्रमशाळांतील समस्या दूर कराव्या, कोटगूल येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे बांधकाम सुरू करावे, राष्टÑीयकृत बॅकांची स्थापना, कोटगूल येथे मंडळ अधिकारी कार्यालया बांधावे, कोटगूल व बोरी येथे धरणाचे बांधकाम, ग्रा. पं. नागंपूर येथे देऊळभट्टी ते गोटाटोला नाल्यावर पूल बांधावा आदी मागण्यांचे निवेदन नांगपूरच्या सरपंच तथा भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष गिरीजा कोरेटी यांनी आ. कृष्णा गजबे यांना सादर केले.