प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:34 AM2021-03-28T04:34:57+5:302021-03-28T04:34:57+5:30

निवेदनात, खाजगीरित्या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना लवकर परवानगी द्यावी, राज्य शासकीय कर्मचारी अपघात विम्याची कपात केलेली नोंद शिक्षकांच्या सेवापुस्तकात करावी, ...

Solve the problems of primary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा

Next

निवेदनात, खाजगीरित्या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांना लवकर परवानगी द्यावी, राज्य शासकीय कर्मचारी अपघात विम्याची कपात केलेली नोंद शिक्षकांच्या सेवापुस्तकात करावी, नियमित, चटोपाध्याय, स्थायी झालेल्या शिक्षकांच्या नोंदी सेवापुस्तकात कराव्या, रजाविषयक सर्व प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावी, नियमित, स्थायी, चटोपाध्याय समिती संदर्भात त्रुटी दुरूस्त करुन जि.प.ला त्वरित पाठविणे, बदली प्रवास देयके निकाली काढणे, संगणक हाताळणाऱ्या लिपिकाची नियुक्ती शिक्षण विभागात करावी, लाॅकडाऊन कालावधीतील उर्वरित शिक्षकांचे प्रलंबित वेतन काढावे, शिक्षकांचे वेतन देयक संबंधित लिपिकाकडूनच बनविण्यात यावे. प्रत्येक महिन्याचे नियमित वेतन बिल २५ तारखेच्या आत लेखा विभागात सादर करावे, शिक्षण विभागातील नियमित, स्थायी, चटोपाध्याय, परीक्षा परवानगीच्या संबंधित फाईल कार्यालयात येऊन विचारणा केलेल्या प्रत्येक शिक्षकाला वेळीच उपलब्ध करुन द्याव्या. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. निवेदनातील सर्व समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात याव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली. चर्चेदरम्यान राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, तालुकाध्यक्ष किशोर कोहळे, सरचिटणीस मारोती वनकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते, कोषाध्यक्ष प्रशांत पोयाम, सुजीत दास, महादेव डे, जगदीश मल्लीक उपस्थित होते.

Web Title: Solve the problems of primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.