आदिवासींच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:03+5:302021-01-08T05:57:03+5:30
गडचिराेली : राज्यातील आदिवासींच्या प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी भाजप अनुसूचित जमाती माेर्चाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह काेश्यारी ...
गडचिराेली : राज्यातील आदिवासींच्या प्रलंबित समस्या लवकर मार्गी लावाव्या, अशी मागणी भाजप अनुसूचित जमाती माेर्चाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भाजप अनुसूचित जमाती माेर्चाचे प्रदेश अध्यक्ष आ. डाॅ. अशाेक उईके यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये ३३८ ए अन्वये महाराष्ट्रात स्वतंत्र अनुसूचित जमाती राज्य आयोग निर्माण स्थापन करावा. विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ पूर्ववत सुरू करावे. राज्यातील २ हजार ८८९ पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी द्यावा. राज्यातील ११ लाख ५५ हजार आदिवासींना खावटी अनुदान खात्यात जमा करण्यात यावे. अतिक्रमित जमिनीचे वनहक्क पट्टे द्यावे. मागासवर्गीयांना पदाेन्नतीत आरक्षण देण्यात यावे. वर्ग तीन व चारची पदे खासगी कंत्राटदारामार्फत भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा आदी मागण्यांचा समावेश हाेता.
याप्रसंगी प्रदेश महामंत्री प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, एन. डी. गावित, मधुकरजी काठे, अशोक गभाले, नीलेश साबळे उपस्थित हाेते.