भविष्य निर्वाह निधीची ब्लॉक बीडीएस समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:25 AM2021-07-15T04:25:52+5:302021-07-15T04:25:52+5:30
कोरोनाने अनेक शिक्षक मृत्युमुखी पडले असून रुग्णालयाच्या खर्चाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. शिक्षकांना अडचणीच्या काळात साहाय्य ठरण्यासाठी दर महिन्याला ...
कोरोनाने अनेक शिक्षक मृत्युमुखी पडले असून रुग्णालयाच्या खर्चाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. शिक्षकांना अडचणीच्या काळात साहाय्य ठरण्यासाठी दर महिन्याला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जीपीएफ खात्यात ठरावीक रक्कम जमा करतात. जमा झालेली रक्कम त्यांना मुलामुलींचे शिक्षण, आजारपण व अन्य कामांसाठी कधीही काढता येते. परंतु, जीपीएफ रक्कम शिक्षकांना आवश्यक वेळी मिळत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने जीपीएफचे बीडीएस गेल्या चार महिन्यांपासून जनरेट केले नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. कोरोनाच्या नावाखाली वित्त विभागाने शिक्षकांच्या जीपीएफचा टॅब बंद करून ठेवला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तसेच आदिवासी उपाययोजना प्लाॅन मधील शाळांतील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्यावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, शिक्षकांच्या अनेक समस्यांवर मराशिप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. निवेदन देताना शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, दिलीप तायडे, रवी मुप्पावार, अरविंद केळझरकर, दिलीप नैताम उपस्थित होते.
130721\4017img-20210713-wa0121.jpg
शिक्षक आमदार नागो गाणार यांना निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावा र