शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:40 AM2021-08-19T04:40:29+5:302021-08-19T04:40:29+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच कायदा यानुसार इयत्ता ६ वी ते ८ वी करिता विषय निहाय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात ...
बालकांचा मोफत व सक्तीच कायदा यानुसार इयत्ता ६ वी ते ८ वी करिता विषय निहाय पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ३३ टक्के पदांनाच वेतनश्रेणी अनुज्ञेय आहे. त्यामुळे या इयत्तांना अध्यापन करणारे शिक्षक पदवीधर असूनसुद्धा गेल्या तीन वर्षांपासून वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. त्यातील कित्येक विषय शिक्षक २-३ वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच यापूर्वी जिल्हा परिषदेने सेवा कनिष्ठ शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ दिल्याने पुढील १० वर्षांपर्यंत अनेक शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणार नाही. सर्व विषय शिक्षकांना समान काम, समान वेतन या न्यायाने पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्याच्या दृष्टीने मंत्रालयात शिक्षण, वित्त व ग्रामविकास विभागाची संयुक्त बैठक लावावी, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.