शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:48 PM2019-07-17T22:48:19+5:302019-07-17T22:48:31+5:30
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देण्यात येते. मात्र सातव्या वेतन आयोगामध्ये चटोपाध्याय व एकस्तर असे वेगळे निकष लावले आहेत. चटोपाध्याय वेतन श्रेणीधारक शिक्षकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणी लावावी. २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने विचार करावा. पहिली ते सातवीच्या शाळांना अट न घालता मुख्याध्यापक पद लागू करावे. रिक्त पदे भरावी. जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल शासनामार्फत भरावे. विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचा शासन निर्णय रद्द करावा. आॅनलाईन कामासाठी केंद्रावर डाटाएन्ट्री आॅपरेटरची नेमणूक करावी. निधीअभावी अर्धवट राहिलेल्या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी निधी द्यावा. शालेय पोषण आहार, बांधकाम आदी कामे शिक्षकांकडून काढून घ्यावी, आदी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सरचिटणिस आशिष धात्रक, सहसरचिटणिस सुरेश पालवे, जेष्ठ नेते प्रमोद कावडकर, राज्य प्रतिनिधी श्रीकांत कुथे, प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था चामोर्शीचे अध्यक्ष राजेश दुधबावरे, उपाध्यक्ष अशोक बोरकुटे, कोषाध्यक्ष लोमेश उंदीरवाडे, गडचिरोली अध्यक्ष धनेश कुकडे, वडसा अध्यक्ष शत्रुघ्न झुरे, मुलचेरा अध्यक्ष गोपाल डे,चामोर्शी अध्यक्ष किशोर कोहळे, सरचिटणिस मारोती वनकर, दामोधर बामनवाडे, जनार्धन म्हशाखेत्री, शंकरराव सुरजागडे, गडचिरोली सहसरचिटणिस वाय.एस तांदळे, सी.आर.राठोड, गुरुदास सोमनकर, दिगांबर देवकते, जी.व्ही.बिडकर, पी.डी.चव्हाण, सुधाकर दुधबळे, जिल्हा उपाध्यक्ष मुर्लीधर सातपुते, अशोक रायसिडाम, मुलचेरा सरचिटणिस सुरेश बडगे, चामोर्शी युवा आघाडी अध्यक्ष सुजित दास, जिल्हा सल्लागार सिताराम भोयर, हेमंत चावरे, देवनाथ बोबाटे, दुर्गम शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कुरवटकर, पुरुषोत्तम माडे, चामोर्शी प्रसिद्धी प्रमुख ऋषीदेव कुनघाडकर, गोरखनाथ तांदळे, नारायण मल्लीक, जगदिश मल्लीक, विजय मल्लीक, महितोष मंडल, चामोर्शी सहसरचिटणिस महादेव डे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते, जितेंद्र रायपुरे, शंकरराव सातपुते,अशोक पोटावी, सुनिल सातपुते, संदिप ऐलावार, उत्तम कोसे, दिलीप बुरांडे, धानोरा सहसरचिटणिस अशोक पाळवदे, बंडु मोहुर्ले, भिकारु घोडाम, सिडाम आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.