कार्यशाळेत ज्युनिअर काॅलेज शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:18+5:302021-07-10T04:25:18+5:30
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अविनाश बोर्डे होते. सभेला प्रा. सूर्यकांत भोंगळे, प्रा. श्रीनिवास चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्राध्यापक उपस्थित ...
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अविनाश बोर्डे होते. सभेला प्रा. सूर्यकांत भोंगळे, प्रा. श्रीनिवास चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्राध्यापक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या निर्देशामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मनात अनेक शंका होत्या. महासंघाने सूचविलेला ३० - ३० - ४० हा फॉर्म्युला जसाच्या तसा राबवून विद्यार्थ्यांना न्याय दिल्यामुळे त्यांनी शासनाचे आभार व्यक्त करून शिक्षकांनी जबाबदारीने आणि योग्य वेळेत मूल्यमापन करावे, असे आवाहन डॉ. अविनाश बोर्डे यांनी केले.
१२वी मूल्यमापनाविषयी महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी १२वी मूल्यमापनासंबंधी अभ्यासपूर्वक व सोयीस्कर तंत्र सांगितले. अनेक शिक्षकांनी विचारलेल्या समस्यांचे व शंकांचे समाधान केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. भाऊराव गोरे यांनी केले. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर जिल्हा सचिव प्रा. विजय कुत्तरमारे यांनी आभार मानले.